1 / 10दिवाळीचा फराळ म्हणजे सगळ्यात लोकप्रिय पदार्थ चकली. सगळ्यांना खमंग, कुरकुरीत अशी चकली खायला फार आवडते. सगळ्यात जास्त मागणी याच पदार्थाला असते. 2 / 10पारंपरिक भाजणीची चकली तांदळाचे पीठ, उडीद डाळ आणि थोडे हरभऱ्याचे पीठ वापरुन करतात. इतरही काही पद्धती आहेत. ही चकली कुरकुरीत आणि थोडी तिखट लागते. दिवाळीच्या फराळात ही सर्वात लोकप्रिय असते.3 / 10साबुदाणा चकली (उपवासाची चकली) वरीचे पीठ, साबुदाणा आणि शेंगदाणा पूड वापरून केली जाते. ही चकली हलकी, खुसखुशीत आणि उपवासात खायला योग्य असते. सैंधव मीठ आणि हिरवी मिरची वापरुन चवदार करता येते.4 / 10राजगिरा चकली राजगिरा पीठ आणि बटाट्याचे मिश्रण वापरुन तयार करतात. उपवासात खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चवीला मस्त आणि थोडी मऊसर लागते. करायला सोपी आहे.5 / 10गव्हाची चकली केली जाते. गव्हाचे पीठ आणि तिखट मसाले वापरुन ही रेसिपी करतात. ही चकली थोडी पौष्टिक आणि कमी तेलकट असते. घरगुती स्नॅक म्हणूनही उत्तम पर्याय आहे.6 / 10बेसन चकली काही ठिकाणी केली जाते. बेसनाचे पीठ वापरुन त्यात इतरही काही पदार्थ घातले जातात. ही चकली जास्त कुरकुरीत आणि मसालेदार असते. चहाबरोबर खायला छान लागते.7 / 10मल्टीग्रेन चकली म्हणजे मिश्र पिठांची चकली करता येते. तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी यांचे मिश्रण वापरतात. ही चकली फायबरयुक्त आणि आरोग्यदायी असते. एअरफ्राय केली तर डायट करणाऱ्यांसाठी पौष्टिक स्नॅक आहे.8 / 10तांदळाची चकली करता येते. फक्त तांदळाचे पीठ आणि मसाले वापरुन तयार केली जाते. ही हलकी, पांढऱ्या रंगाची आणि खमंग असते. लहान मुलांना ही रेसिपी खास आवडेल. नक्की करा. 9 / 10चीज चकली हा जरा वेगळा प्रकार आहे. चीज, बटर आणि कॉर्नफ्लोअर वापरुन केली जाते. ही जरा नवी आणि मुलांना आकर्षक वाटणारी रेसिपी आहे. चवीला हलकी तिखट आणि चीझी लागते.10 / 10बटाट्याची चकली करता येते. उकडलेला बटाटा आणि तांदळाच्या पिठापासून करतात. त्यात इतरही पिठं वापरता येतात. विकतही मिळते तसेच लहान मुले हा पदार्थ आवडीने खातात.