1 / 9गोडाचा शिरा हा पदार्थ आपण वरचेवर तयार करतो. झटपट तयार होतो आणि शक्यतो सगळ्यांच्या आवडीचा असतो. चवीलाही फार छान लागतो. अनेक घरांमध्ये नाश्त्यासाठीही शिरा तयार केला जातो.2 / 9भारतामध्ये एकूण किती गोड पदार्थ तयार केले जातात? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीणच आहे. भरपूर पदार्थ आहेत. खासियत म्हणजे एका गोड पदार्थाला उपपदार्थही असतात. आज शिरा करायचा ठरवले तर मग कोणता शिरा असा प्रश्न पडू शकतो. एवढे विविध प्रकार शिऱ्यामध्ये आहेत. 3 / 9रव्याचा शिरा हा प्रकार आपल्याला माहितीच आहे. त्यामध्ये विविध पदार्थ घालून आणखी स्वादिष्ट असा वेगळा शिरा तयार केला जाते. तुम्ही शिऱ्याचे हे सारे प्रकार खाल्ले आहेत का?4 / 9प्रसादाचा शिरा चवीला फारच छान लागतो. हा शिरा फक्त रव्याचा नसतो. त्यामध्ये केळे घातलेले असते. बाकी कृती सारखीच असते. फक्त केळे कुसकरून दुधाबरोबर रव्यामध्ये घालायचे. केळीचा शिरा फारच मस्त लागतो.5 / 9महाराष्ट्रामध्ये हॉटेलच्या मेन्यूमध्ये पायनॅपल शिरा असतोच. अगदी ढाब्यावर किंवा एसटी कॅन्टींनमध्येही हा शिरा मिळतो. पिवळ्या रंगाचा हा शिरा चवीला फारच मस्त लागतो. अननसाचा शिरा मऊ आणि जिभेवर ठेवल्यावर विरघळणारा असतो.6 / 9फ्यूजन फुड हा प्रकार फार लोकप्रिय आहे. शिऱ्याचेही फ्यूजन झाले आहे. त्यातून कमालीचा चॉकलेट शिरा तयार झाला. लहान मुलांना हा प्रकार नक्कीच आवडेल. चवीला वेगळा आणि छान लागतो.7 / 9शेवयांची खीर आपण अनेकदा तयार करून खातो. मात्र शेवयांचा शिराही केला जातो. गोड तिखट दोन्ही चवींचा करता येतो. करायला फार वेळही लागत नाही. झटपट होतो.8 / 9मे महिन्यामध्ये आंब्याचे अनेक पदार्थ आपण तयार करतो. कधी आंब्याचा शिरा खाल्ला आहे का? हा मॅन्गो शिरा फारच रुचकर असतो. शिरा तयार करताना त्यामध्ये आंब्याचा रस घालायचा आणि आटवून घ्यायचा. 9 / 9गव्हाच्या पीठाचा शिरा तयार केला जातो. चवीला साध्या शिरापेक्षा फार वेगळा असतो. त्यामध्ये काही जणं थोडा रवाही मिक्स करतात. छान मऊ आणि चविष्ट होतो.