प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

Updated:April 4, 2025 20:04 IST2025-04-04T19:57:51+5:302025-04-04T20:04:46+5:30

different types of sheera, tasty and soft : शिरा अनेक प्रकारे तयार केला जातो. पाहा किती प्रकार आहेत, तुम्हाला कोणता आवडतो?

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

गोडाचा शिरा हा पदार्थ आपण वरचेवर तयार करतो. झटपट तयार होतो आणि शक्यतो सगळ्यांच्या आवडीचा असतो. चवीलाही फार छान लागतो. अनेक घरांमध्ये नाश्त्यासाठीही शिरा तयार केला जातो.

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

भारतामध्ये एकूण किती गोड पदार्थ तयार केले जातात? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीणच आहे. भरपूर पदार्थ आहेत. खासियत म्हणजे एका गोड पदार्थाला उपपदार्थही असतात. आज शिरा करायचा ठरवले तर मग कोणता शिरा असा प्रश्न पडू शकतो. एवढे विविध प्रकार शिऱ्यामध्ये आहेत.

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

रव्याचा शिरा हा प्रकार आपल्याला माहितीच आहे. त्यामध्ये विविध पदार्थ घालून आणखी स्वादिष्ट असा वेगळा शिरा तयार केला जाते. तुम्ही शिऱ्याचे हे सारे प्रकार खाल्ले आहेत का?

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

प्रसादाचा शिरा चवीला फारच छान लागतो. हा शिरा फक्त रव्याचा नसतो. त्यामध्ये केळे घातलेले असते. बाकी कृती सारखीच असते. फक्त केळे कुसकरून दुधाबरोबर रव्यामध्ये घालायचे. केळीचा शिरा फारच मस्त लागतो.

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

महाराष्ट्रामध्ये हॉटेलच्या मेन्यूमध्ये पायनॅपल शिरा असतोच. अगदी ढाब्यावर किंवा एसटी कॅन्टींनमध्येही हा शिरा मिळतो. पिवळ्या रंगाचा हा शिरा चवीला फारच मस्त लागतो. अननसाचा शिरा मऊ आणि जिभेवर ठेवल्यावर विरघळणारा असतो.

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

फ्यूजन फुड हा प्रकार फार लोकप्रिय आहे. शिऱ्याचेही फ्यूजन झाले आहे. त्यातून कमालीचा चॉकलेट शिरा तयार झाला. लहान मुलांना हा प्रकार नक्कीच आवडेल. चवीला वेगळा आणि छान लागतो.

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

शेवयांची खीर आपण अनेकदा तयार करून खातो. मात्र शेवयांचा शिराही केला जातो. गोड तिखट दोन्ही चवींचा करता येतो. करायला फार वेळही लागत नाही. झटपट होतो.

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

मे महिन्यामध्ये आंब्याचे अनेक पदार्थ आपण तयार करतो. कधी आंब्याचा शिरा खाल्ला आहे का? हा मॅन्गो शिरा फारच रुचकर असतो. शिरा तयार करताना त्यामध्ये आंब्याचा रस घालायचा आणि आटवून घ्यायचा.

प्रसादाचा शिरा आवडतोच पण पाहा महाराष्ट्रात किती प्रकारचा शिरा करतात, एकाहून एक भारी..

गव्हाच्या पीठाचा शिरा तयार केला जातो. चवीला साध्या शिरापेक्षा फार वेगळा असतो. त्यामध्ये काही जणं थोडा रवाही मिक्स करतात. छान मऊ आणि चविष्ट होतो.