1 / 7पावसाळा आणि कांदा भजीचे समीकरण काही वेगळेच. कुरकुरीत कांदा भजी कोणाला नाही आवडणार. अनेकदा भजी करताना ती कुरकुरीत होत नाही किंवा तेल अधिक प्रमाणात लागते. (how to keep onion bhaji crispy)2 / 7कांदा भजी जितकी जास्त कुरकुरीत असतील तितकीच त्याची चव चांगली. बऱ्याचदा कांदा भजी तळल्यानंतर अधिक मऊ पडतात. विकत आणलेली कांदा भजी कुरकुरीत लागतात पण घरी केलेली भजी मऊ होतात किंवा पाणी सुटते. पण या काही टिप्स लक्षात ठेवल्या तर कांदा भजी नुसत्या कुरकुरीत नाही तर एकदम परफेक्ट होतील.(onion bhaji not soggy trick)3 / 7कांदा भजी करण्यासाठी कांदे पातळ कापायला हवे. म्हणजे कांदे तेलात तळण्यासाठी फार वेळ लागणार नाही. 4 / 7भजी तळताना तेल कडकडीत गरम नसावे. तेल मध्यम आचेवर गरम करा. ज्यामुळे भजी तळताना कच्ची राहणार नाही आणि चविष्ट कुरकुरीत होतील. 5 / 7भजीचे पीठ तयार करताना बेसनाच्या पीठात २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ घाला. ज्यामुळे भजी तळल्यानंतर मऊ पडणार नाही. 6 / 7भजी तळताना तेल जास्त प्रमाणात शोषत असेल तर गरम तेलात मीठ टाकावे. त्यामुळे भजी जास्त तेलकट होणार नाही. 7 / 7भजीचे बॅटर तयार करताना ते व्यवस्थित फेटून घ्या. भजी मस्त कुरकुरीत होतील.