चैत्रगौर फराळ: बेसन लाडू चिकट होतो, खाताना टाळूला चिकटतो? घ्या परफेक्ट लाडूंची सोपी रेसिपी

Updated:April 10, 2026 09:35 IST2026-04-10T09:32:56+5:302026-04-10T09:35:01+5:30

चैत्रगौर फराळ: बेसन लाडू चिकट होतो, खाताना टाळूला चिकटतो? घ्या परफेक्ट लाडूंची सोपी रेसिपी

बऱ्याच घरांमध्ये सध्या चैत्रगौर बसलेली आहे आणि त्यानिमित्त घरोघरी सध्या उत्साहात हळदीकुंकू कार्यक्रम होत आहेत. आता चैत्रगौरीचे हळदीकुंकू म्हणजे लाडू, करंजी, शेव, चकली असे वेगवेगळे पदार्थ केले जातात.

चैत्रगौर फराळ: बेसन लाडू चिकट होतो, खाताना टाळूला चिकटतो? घ्या परफेक्ट लाडूंची सोपी रेसिपी

त्यात बेसनाचे लाडू करायचे म्हणजे मग अनेकजणींना टेन्शन येतं. वर्षांनुवर्षांपासून हे लाडू करून करून ज्यांचा हात अगदी परफेक्ट बसला आहे, त्या काकू, मावशी, आई हे लाडू अगदी झटपट करून मोकळ्या हाेतात. पण नव्याने या सगळ्या गोष्टी करणाऱ्या तरुण मैत्रिणींना मात्र बेसनाचे लाडू करणं अवघड वाटतं.

चैत्रगौर फराळ: बेसन लाडू चिकट होतो, खाताना टाळूला चिकटतो? घ्या परफेक्ट लाडूंची सोपी रेसिपी

कधी बेसन पक्कं भाजलं गेलं आहे की नाही हेच कळत नाही तर कधी बेसन आणि साखरेचं प्रमाण चुकतं आणि लाडूचा पार फज्जा उडतो. असं काहीही तुमच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा.

चैत्रगौर फराळ: बेसन लाडू चिकट होतो, खाताना टाळूला चिकटतो? घ्या परफेक्ट लाडूंची सोपी रेसिपी

यासाठी तर सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये अर्धा किलो बेसन घालून ते भाजून घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर पुढच्या एखाद्या मिनिटांतच त्यात साधारण २०० ग्रॅम तूप घाला आणि दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव करून मध्यम आचेवर ७ ते ८ मिनिटे भाजून घ्या. त्याला रंग थोडा चॉकलेटी पिवळसर व्हायला हवा.

चैत्रगौर फराळ: बेसन लाडू चिकट होतो, खाताना टाळूला चिकटतो? घ्या परफेक्ट लाडूंची सोपी रेसिपी

भाजून झालेलं बेसन एका भांड्यात काढून घ्या. ते थंड झालं की मग त्यात ३०० ग्रॅम पिठीसाखर घाला.

चैत्रगौर फराळ: बेसन लाडू चिकट होतो, खाताना टाळूला चिकटतो? घ्या परफेक्ट लाडूंची सोपी रेसिपी

सुगंध येण्यासाठी थोडी वेलची पूडही घाला. सगळं पीठ हलवून छान एकजीव झालं की त्याचे लाडू वळा.