Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फ्लॉवरच्या भाजीची पानं आणि देठ फेकू नका कचऱ्यात, पोषणाचा खजिना तुम्ही वाया घालवताय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:18 IST

1 / 7
Cauliflower Leaves Benefits: सीझन कोणताही असो फुलकोबीची भाजी मात्र लोक नेहमीच आवडीनं खातात. फुलकोबी - मटार, फुलकोबी - बटाटे अशा कॉम्बिनेशनच्या भाज्या तर सर्रासपणे घराघरांमध्ये केल्या जातात. पण एक कॉमन गोष्ट नेहमीच बघायला मिळते, ती म्हणजे फुलकोबीची पानं आणि देठं महिला कचरा समजून फेकतात. अनेकांना हे माहीत नसतं की, या पानांमध्ये आणि देठांमध्ये सुद्धा इतके पोषक तत्व असतात, ज्यांचा आपण कधी विचार केला नसेल. फुलकोबीच्या पानांमध्ये आणि देठांमध्ये कोणते व्हिटामिन्स असतात आणि त्यांचे शरीराला काय काय फायदे मिळतात हे जर आपल्याला कळालं तर ते आपण कधी फेकणारच नाही.
2 / 7
फुलकोबीच्या पानांमध्ये प्रोटीन आणि मिनरल्स भरपूर असतात. जे मुलांच्या शारीरिक विकासात मदत करतात. त्यांची उंची, वजन आणि हीमोग्लोबिन लेव्हल वाढवण्यासही हे मिनरल्स फायदेशीर ठरतात.
3 / 7
तसेच फुलकोबीच्या पानांमध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. फायबर हे अन्न पचनासाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. फायबरने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
4 / 7
हल्ली डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या अनेकांना होत राहतात. अशात ही पानं खूप फायदेशीर ठरतील. कारण यात डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटामिन ए मुबलक प्रमाणात असतं. व्हिटामिन ए ने नाइट ब्लाइंडनेससारख्या समस्या टाळता येतात.
5 / 7
तसेच फुलकोबीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्सही भरपूर असतात. जे शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. इतकंच नाही तर यांनी ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासही मदत मिळते.
6 / 7
फुलकोबीच्या पानांमधील व्हिटामिन आणि मिनरल्सचा खजिना इतक्यावरच थांबत नाही. या पानांमध्ये कॅल्शिअम भरपूर असतं. जे हाडांना मजबूत करण्यास मदत करतं. महिलांसाठी ही पानं अधिक फायदेशीर मानली जातात. कारण मेनोपॉज दरम्यान होणाऱ्या काही समस्या यांनी दूर करण्यास मदत मिळते.
7 / 7
फुलकोबीची पानं आणि देठं सलाद, सूप, भाजी किंवा स्टू च्या रूपात सहजपणे खाल्ली जाऊ शकतात. हलके मसाले यांची टेस्ट आणखी वाढवतील. यांपासून काही वेगळे हेल्दी आणि टेस्टी पदार्थही बनवू शकता.
टॅग्स : अन्नहेल्थ टिप्स