Join us

खरंच वांगी खाल्ल्यानं किडनी स्टोनचा धोका वाढतो? जाणून घ्या काय आहे फॅक्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:42 IST

1 / 7
Brinjal Can Cause Kidney Stone :वेगवेगळ्या लोकांच्या आपापल्या वेगवेगळ्या आवडी-निवडी असतात. भाज्यांबाबतही असंच असतं. एखाद्याला एखादी भाजी आवडत नाही तर दुसऱ्याला तिच भाजी खूप आवडते. अशीच एक भाजी म्हणजे वांगी जी काहींना आवडते तर काहींना नाही. वांग्याच्या भाजीबाबत असं म्हटलं जातं की, ही भाजी खाल्ल्यानं किडनी स्टोन होतो. खासकरून अशा लोकांना ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या राहिलेली आहे.
2 / 7
घराघरांमध्ये वांगी वेगवेगळ्या पद्धतीनं केली जातात. कुणी भरलेली वांगी खातात, तर कुणाला वांग्याचं भरीत आवडतं. वांग्यांमध्ये अनेक पोषक तत्वही असतात. वांग्यांमध्ये फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटामिन बी12 आणि मॅग्नेशिअमसारखे तत्व असतात. तसेच ही एक लो-कॅलरी भाजी आहे. जे पचनास आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते.
3 / 7
वांग्यांमध्ये इतरही अनेक पोषक तत्वांसोबतच ऑक्सालेट नावाचं तत्व सुद्धा असतं. हेच ऑक्सालेट शरीरात जाऊन कॅल्शिअमसोबत मिळून क्रिस्टल तयार करतं. ज्यामुळे पुढे जाऊन किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका असतो.
4 / 7
वांगी खाणं सगळ्यांसाठीच नुकसानकारक नसते. पण काही लोकांनी ही भाजी खाऊ नये असं एक्सपर्ट सांगतात. जसे की, ज्या लोकांना आधीच किडनी स्टोनची समस्या होती त्यांनी हाय ऑक्सलेट असलेले फूड्स टाळले पाहिजे. वांगी सुद्धा त्यातीलच एक आहे.
5 / 7
सामान्यपणे आठवड्यातून 2 ते 3 वेळा वांगी खाणं एका स्वस्थ व्यक्तीसाठी सुरक्षित मानलं जातं. पण जर तुमच्या परिवारात कुणाला किडनी स्टोनचा इतिहास किंवा डॉक्टरांनी सांगितलं असेल तर वांगी कमी प्रमाणात खावीत.
6 / 7
जर तुम्हाला वांगी खायला आवडत असतील आणि किडनी स्टोनचा धोका टाळायचा असेल तर डाएटमध्ये लिंबू पाण्याचा समावेश करा, भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि कमी मीठ खा.
7 / 7
अनेक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, वांगी कमी प्रमाणात खाल्ल्यानं कोणतीही गंभीर समस्या होत नाही. पण जर तुम्हाला स्टोनची समस्या असेल तर वांग्यांसोबतच पालक, चॉकलेट आणि सोया प्रोडक्ट्स कमी खा.
टॅग्स : अन्नहेल्थ टिप्स