1 / 8विविध भाज्या खाणे आरोग्यासाठी गरजेचे असते. काही भाज्या आपण आवडीने खात नाही. मात्र त्या आपल्यासाठी उपयुक्त असतात. दुधी भोपळा खाणे फार चांगले ठरते. भाजी, पराठा असे पदार्थ करुन नक्की खा. 2 / 8तसे दुधी भोपळा बारमाही मिळणारी भाजी आहे. त्याची लागवड फेब्रुवारी ते जूनच्या दरम्यान केली जाते. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये मस्त ताजा दुधी खायला मिळतो. इतरही महिन्यांमध्ये पिक घेतले जातेच. 3 / 8उन्हाळ्यात दुधीची भाजी खाणे फार उपयुक्त ठरते. त्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. तसेच त्यात फायबर असते. जीवनसत्वे असतात. त्यात खनिजेही असतात. विविध गुणधर्मांनी दुधी परिपूर्ण असतो. 4 / 8दुधीत फायबर असल्याने पचनाची क्रिया फार चांगली होते. बद्धकोष्टता तसेच अपचन, गॅस असे काही त्रास होत नाहीत. पचनाची प्रक्रिया अगदी छान होते. 5 / 8डिटॉक्सची प्रक्रिया करण्यासाठी दुधीची शरीराला मदत होते. तसेच लिव्हरच्या आरोग्यासाठीही दुधीचा रस चांगला असतो. लिव्हरचे कार्य सुधारते. 6 / 8दुधीत जीवनसत्त्व सी असते. तसेच अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेसाठी तसेच केसांसाठी दुधी फार चांगला असतो. केसांच्या आरोग्यासाठी दुधी फारच पौष्टिक असतो. 7 / 8दुधीत पाण्याचे प्रमाण भरपूर असते. कॅलरीज अगदी कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही दुधी खाणे फायद्याचे ठरते. 8 / 8दुधी भोपळा खाणे हा मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी मस्त उपाय आहे. रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्याचे काम दुधीच्या रसातील सत्व करतात.