फक्त १ चमचा भोपळ्याच्या बिया रोज खा, ५ जबरदस्त फायदे, केस आणि त्वचाही होईल सुंदर
Updated:April 9, 2026 13:32 IST2026-04-09T13:23:05+5:302026-04-09T13:32:02+5:30

भोपळा बहुगुणी आहे, आरोग्यासाठी चांगला आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण आता त्या भोपळ्याच्या बियाही नियमितपणे खायला सुरुवात करा (benefits of eating pumpkin seeds). कारण त्या एवढ्याशा बिया म्हणजे खरोखरच तब्येतीसाठी एक पॉवर हाऊस आहे...(5 amazing benefits of eating pumpkin seeds daily)
रोज सकाळी नियमितपणे १ चमचाभरच भोपळ्याच्या बिया खा. कारण तेवढ्याच तुम्हाला कित्येक फायदे मिळवून देतात. रात्री झोपण्यापुर्वी वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्यात भोपळ्याच्या बिया भिजत घालायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या खायच्या.
भोपळ्याच्या बियांमधून चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतं. त्या तुम्ही रोज खाल्ल्या तर स्नायुंना असणारी प्रोटीन्सची गरज भरून निघण्यास नक्कीच मोठी मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतं. त्यामुळे स्ट्रेस कमी होऊन शांत झोप येण्यास मदत होते. त्यामुळे ज्या लोकांना रात्री शांत झोप येत नाही त्यांनी काही दिवस भोपळ्याच्या बिया खाऊन पाहाव्या.
भोपळ्याच्या बियांमध्ये असणाऱ्या झिंकमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे वारंवार दुखणं, आजारपण यापासून आपलं संरक्षण होतं.
झिंक हे केसांच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं. झिंक आहारात पुरेशा प्रमाणात असेल तर केस आणि त्वचाही चांगली राहण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा ३ चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही त्यांची मदत होते.
ट्रिप्टोफॅन हे एक प्रकारचं अमिनो ॲसिडही भोपळ्याच्या बियांमध्ये असतं. ते मूड चांगला ठेवण्यासाठी मदत करतं.