1 / 6काजू, बदाम, अक्रोड या सुकामेव्याला जेवढं महत्त्व आहे, तेवढं महत्त्व आपण खारकेला देतच नाही. पण खरंतर खारीकही अतिशय पौष्टिक आहे. 2 / 6रोज सकाळ संध्याकाळ एकेक खारीक तुम्ही खाल्ली तरी आरोग्याला कित्येक फायदे होऊ शकतात असं डॉक्टर सांगत आहेत. ते फायदे नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी ayurveda.lifestyle.hub या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.3 / 6यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महिलांचे मासिक पाळीच्या काळातले कित्येक त्रास कमी करण्यासाठी खारीक अतिशय उपयुक्त ठरते. खारीक खाल्ल्याने पाळी नियमित होण्यासही मदत होते.4 / 6सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनीही सकाळ संध्याकाळ एकेक खारीक खायला हवी. काही दिवस नियमितपणे खारीक खाऊन पाहा. सांधेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होईल.5 / 6खारीकेच्या रुपातून शरीराला सगळे धातू मिळतात. त्यामुळे आलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठीही खारीकेची खूप मदत होते.6 / 6 गळून गेल्यासारखं होत असेल तर खारीक खाण्यावर भर द्या. अंगात उर्जा येईल. तरतरी येऊन फ्रेश वाटेल. आजारी माणसालाही खारीक खायला द्यावी.