1 / 6खजूर अतिशय पौष्टिक असतात. त्यामुळेच ते रोज खायला हवे असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. जर तुम्ही रोज एक पाण्यात भिजवलेला खजूर खाल्ला तर त्याचे आरोग्याला कसे लाभ होतात ते पाहा.. 2 / 6खजूरामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्यांनी खजूर नियमितपणे खायला हवा.3 / 6खजुरामध्ये नॅचरल शुगर आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्यातून लगेचच एनर्जी मिळते आणि पुढे बराच वेळ ती टिकून राहाते.4 / 6खजूर प्री बायोटीक म्हणूनही काम करतं. म्हणजेच त्याच्यातून असे काही चांगले बॅक्टेरिया मिळतात जे पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत करतात.5 / 6खजुरामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळेच ते थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करतात. शिवाय खजुरामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. 6 / 6खजूर रात्रभर पाण्यात भिजत घालून जर दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ले तर ते पचायला अधिक सोपे जातात. ही माहिती आहारतज्ज्ञांनी leemamahajan या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.