1 / 7उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात जर थंडगार रायते, कोशिंबीर असेल तर जेवण नक्कीच चांगलं होतं. म्हणूनच आता बीटरुट रायत्याची ही एक सोपी आणि अगदी खास रेसिपी पाहा...(beetroot raita recipe) 2 / 7बीटरुट रायता करण्यासाठी सगळ्यात आधी बीटरुट स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्या. आणि त्याचे अगदी बारीक काप करा.(how to make beet root raita for summer?)3 / 7यानंतर आता एक छोट्या आकाराचा कांदा घ्या आणि तो अगदी बारीक चिरा. 4 / 7आता एका भांड्यात चिरलेलं बीट रुट, चिरलेला कांदा एकत्र करा. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.5 / 7यानंतर त्यामध्ये फेटून घेतलेलं थंडगार दही घाला. थोडा चाट मसाला, थोडी जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घाला.6 / 7यानंतर छोट्याशा कढईत तूप गरम करून घ्या. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, कडिपत्ता घालून फोडणी करून घ्या.7 / 7कडकडीत फोडणी रायत्यामध्ये घातली की रायते अधिक चवदार होते. एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.