चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

Updated:April 10, 2026 18:08 IST2026-04-10T17:56:44+5:302026-04-10T18:08:38+5:30

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात जर थंडगार रायते, कोशिंबीर असेल तर जेवण नक्कीच चांगलं होतं. म्हणूनच आता बीटरुट रायत्याची ही एक सोपी आणि अगदी खास रेसिपी पाहा...(beetroot raita recipe)

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

बीटरुट रायता करण्यासाठी सगळ्यात आधी बीटरुट स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्या. आणि त्याचे अगदी बारीक काप करा.(how to make beet root raita for summer?)

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

यानंतर आता एक छोट्या आकाराचा कांदा घ्या आणि तो अगदी बारीक चिरा.

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

आता एका भांड्यात चिरलेलं बीट रुट, चिरलेला कांदा एकत्र करा. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

यानंतर त्यामध्ये फेटून घेतलेलं थंडगार दही घाला. थोडा चाट मसाला, थोडी जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घाला.

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

यानंतर छोट्याशा कढईत तूप गरम करून घ्या. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, कडिपत्ता घालून फोडणी करून घ्या.

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

कडकडीत फोडणी रायत्यामध्ये घातली की रायते अधिक चवदार होते. एकदा नक्कीच ट्राय करून पाहा.