Join us

पोळा स्पेशल : परफेक्ट पुरण करण्यासाठी ५ टिप्स, पुरणपोळी होईल मऊ लुसलुशीत - टम्म फुगेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 14:53 IST

1 / 7
सण-समारंभ असले की महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पुरणपोळीचा बेत हमखास असतो. पुरण बनवण्यापासून ते पोळी लाटण्यापर्यंत अनेक गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. अनेकदा पुरणपोळी लाटताना फुटते किंवा पुरण व्यवस्थित बनत नाही. (Puranpoli recipe)
2 / 7
आपली ही पुरणपोळी लाटताना फुटत असेल, सारण बाहेर येत असेल किंवा पोळी कडक होत असेल तर काही सोप्या ट्रिक वापरुन पाहा. पोळी होईल अगदी लुसलुशीत आणि फुगेलही मस्त. (Tips for soft puranpoli)
3 / 7
पुरणपोळी लाटताना ती फाटत असेल तर पुरण नीट शिजवून थंड होऊ द्या. घट्ट आणि जाड पुरण वापरल्यास पोळी फाटत नाही.
4 / 7
पोळीसाठी कणिक मळताना त्यात थोडं तेल, कोमट पाणी घालून मळा. ३० मिनिटे कणिक झाकून ठेवल्यास त्याची लवचिकता वाढते. ज्यामुळे पोळी व्यवस्थित लाटली जाते.
5 / 7
पुरण भरल्यानंतर पोळी लाटताना ती हलक्या हाताने लाटा. ज्यामुळे पुरण नीट पसरेल आणि पोळी फाटणार नाही.
6 / 7
पोळी भाजताना तवा हा अधिक गरम नसायला हवा. यामुळे पोळी जळते. पोळी तव्यावर टाकताना गॅस मंद आचेवर ठेवा. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत पोळीला भाजा.
7 / 7
पोळी भाजल्यानंतर तेल लावण्याऐवजी तूप लावा. तूप लावल्यास ती कडक होत नाही. मऊ लुसलुशीत राहते आणि तिची चव देखील वाढते.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती