आवळ्याची चटकमटक चटणी- करायला सोपी आणि चवीला लय भारी, घ्या टेस्टी रेसिपी...
Updated:November 10, 2025 16:00 IST2025-11-10T15:53:38+5:302025-11-10T16:00:35+5:30

सध्या बाजारात भरपूर प्रमाणात आवळे आलेले आहेत. त्या आवळ्यांची चटपटीत चटणी करून खा. बघा जेवणात कशी रंगत येते...(amla chutney recipe)
आवळ्याची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी आवळे चिरून घ्या आणि त्यातल्या बिया काढून टाका. आता आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका.(how to make amla chutney?)
त्यातन सुकलेल्या लाल मिरच्या आणि २ टेबलस्पून किसलेलं खोबरं घाला.
कडिपत्त्याची पानंही चटणीमध्ये घाला. जेणेकरून चटणीला एक छान स्वाद येतो.
याशिवाय लसूणाच्या ७ ते ८ पाकळ्या, बारीक चिरलेला अर्धा कांदा आणि आल्याचा एक लहानसा तुकडाही मिक्सरमध्ये घाला.
आता चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालून हे पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
आवळ्याची चटणी एका भांड्यात काढा आणि चवीनुसार त्यात मीठ घाला. या चटणीला वरतून छान कडक फोडणी द्या. अतिशय चटपटीत चवीची आवळा चटणी तयार...