Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळा स्पेशल रेसिपी- आवळ्याचं तिखट- गोड चटपटीत लोणचं, १५ मिनिटांत लोणचं तयार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2025 09:35 IST

1 / 7
आवळ्याचं चटपटीत लोणचं अगदी झटपट करता येतं. हिवाळ्यात मिळणारे ताजे ताजे आवळे घ्या आणि पटकन पुढे सांगितलेली रेसिपी पाहून त्याचं लोणचं करा..
2 / 7
आवळ्याचं लोणचं करण्यासाठी आपल्याला साधारण १ कप आवळ्याचे काप लागणार आहेत. आवळे घेऊन ते स्वच्छ धुवा आणि त्यांचे काप करा. बिया काढून टाका.
3 / 7
त्यानंतर मोहरी, जीरे, धणे प्रत्येकी एकेक चमचा घ्या. अर्धा चमचा मेथ्या घ्या. हे सगळे पदार्थ मंद आचेवर हलके भाजून घ्या.
4 / 7
भाजून घेतलेले पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर करून घ्या.
5 / 7
कढईमध्ये तेल घालून गरम करा. त्यानंतर त्यात आवळ्याचे काप टाकून ते २ ते ३ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. आवळ्याचा रंग थोडा बदलल्यानंतर गॅस बंद करा.
6 / 7
आता त्याच कढईमध्ये तयार केलेला मसाला, मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की आवळ्याचं लोणचं झालं तयार..
7 / 7
हे लोणचं थोडं आणखी चटपट आणि थोडासा गोड फ्लेवर असणारं हवं असेल तर त्यात अर्धा कप किसलेला गूळ घाला. लोणच्याची चवच आणखी खुलेल.. हे लोणचं महिनाभर तरी छान टिकतं.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.