1 / 6अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस. शिवाय या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे बहुसंख्य लोक अक्षय्य तृतीयेपासूनच आमरस खायला सुरुवात करतात. त्यामुळे या दिवशी घरोघरी आमरस पुरी किंवा आमरस पोळीचा बेत करण्यात येतो.2 / 6आता आमरस करण्याआधी जर काही गोष्ट लक्षात ठेवल्या तर तुम्हाला रस खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येईल. शिवाय आंब्याचा त्रास होऊन वजन, शुगर मुळीच वाढणार नाही.3 / 6आंबे आणल्यानंतर तर ते एखादा तास थंड पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते स्वच्छ पुसून कोरडे करून घ्या आणि मगच रस करा. कारण यामुळे आंब्यामधली उष्णता कमी होते.4 / 6आंबा पिळून त्याचा रस काढल्यानंतर तो मिक्सरमधून फिरवू नका. तो जसाच्या तसाच खा. कारण आमरस मिक्सरमधून फिरवल्यामुळे त्यातील फायबर नष्ट होतात आणि तो पचायला अवघड होतो.5 / 6आमरसामध्ये साखर घालणेही टाळावे. यामुळे अतिरिक्त कॅलरी पोटात जातात आणि वजन, शुगर दोन्ही वाढते.6 / 6आमरस त्याच्या नैसर्गिक स्वरुपात खाल्ला तर तो बाधत नाही. त्यामुळे खरंतर त्यात दूध, पाणी असं काहीही घालू नये. तो जसा आहे तसाच खायला हवा.