Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अभिनेत्री भाग्यश्री सांगते हिवाळ्यात मटार खाण्याचे ४ फायदे आणि मटारच्या भाजीची ५ मिनिटांत होणारी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2025 13:00 IST

1 / 8
मटारच्या हिरव्यागार शेंगा बाजारात दिसू लागल्या की हिवाळा ऋतू सुरू झाल्याची पुन्हा एकदा नव्याने आठवण होते. हिवाळ्यात मिळणारा हा अस्सल पदार्थ खायलाच हवा. कारण त्यातून जे पोषण मिळतं ते पुढे वर्षभर आपल्या शरीराला साथ देतं.
2 / 8
अभिनेत्री भाग्यश्रीनेही हिवाळ्यात मटारच्या शेंगा खाण्याचे फायदे सोशल मीडियावर शेअर केले असून मटारच्या दाण्यांची एक सोपी रेसिपीही शेअर केली आहे.
3 / 8
भाग्यश्री सांगते की मटारच्या छोट्याशा दाण्यांमधूनही भरपूर प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे मटार कचोरी, मटार पुलाव, मटार पराठे, मटार चाट असे मटारचे वेगवेगळे पदार्थ या दिवसांत अवश्य खावे.
4 / 8
याशिवाय मटार व्हिटॅमिन्सच्या बाबतीतही एकदम समृद्ध आहे. मटारच्या दाण्यांमधून व्हिटॅमिन ए, बी, सी, ई देखील पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या दिवसांत खायलाच हवे.
5 / 8
मटारमधून फॉस्फरस आणि झिंक भरपूर प्रमाणात मिळते. फॉस्फरस हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते तर झिंक केसांसाठी पोषक आहे.
6 / 8
मटारमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे अपचन, ॲसिडीटी, कॉन्स्टिपेशन असे त्रास कमी करण्यासाठी मटार उपयुक्त ठरते.
7 / 8
मटारच्या शेंगांची भाजी करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे कढईमध्ये थोडं बटर किंवा तेल गरम करायला ठेवा. त्यानंतर मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करून घ्या.
8 / 8
यानंतर त्यामध्ये लसूण, आलं घालून मटारचे दाणे घाला आणि चवीनुसार मीठ, तिखट, धनेपूड घालून अगदी हलके वाफवून घ्या. मटार फ्राय किंवा मटारची भाजी झाली तयार.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाग्यश्री