मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

Updated:June 5, 2025 16:35 IST2025-06-05T16:30:59+5:302025-06-05T16:35:32+5:30

A handful of Karvand will keep you fit all year round! : पावसाळ्यात हे फळ खाणे आरोग्यासाठी ठरते फायद्याचे. करवंद खा आणि आरोग्य छान ठेवा.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंद हे एक फार पौष्टिक फळ आहे. त्यामध्ये पोषण तर असतेच मात्र त्याची चवही छान आंबट गोड असते. महाराष्ट्रात खेड्यांमध्ये गावाकडे करवंदाच्या जाळी लगडल्या की लहान मुले त्यावर तुटून पडतात. छान टपोऱ्या करवंदांचा आस्वाद घेतात. शहराकडे करवंद जरा उशीराने पोहचतात. मात्र सगळीकडेच हे फळ आवडीने खाल्ले जाते.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंदाचे सरबत करता येते. त्याचे लोणचे केले जाते. नुसते करवंद छान लागते. फक्त चीक धुवायचा आणि मगच खायची. करवंदांना मीठ लावायचे. खाण्या आधी मीठ पाण्यात भिजत ठेवायची. मीठ पाण्यामुळे त्यावर किटाणू शिल्लक राहत नाहीत.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंदामध्ये जीवनसत्त्व सी आणि अँण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. या गुणधर्मांमुळे सर्दी,ताप आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. करवंद खाणे फायद्याचे ठरते.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंदात असलेले फायबर आणि पेक्टिन पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. करवंद खाल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. पोट छान साफ होते.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंदातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स हृदयाच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहेत. करवंदातील पोषणसत्वे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंदामध्ये असलेले फ्लावोनॉइड्स आणि फायटोकेमिकल्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे करवंद खाणे मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकते.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंदात भरपूर प्रमाणात लोह असते. जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. तसेच अॅनिमियापासून संरक्षण करण्यास मदत करते. लोकाचा उत्तम स्त्रोत म्हणजे करवंद.

मूठभर करवंद वर्षभर तुम्हाला ठेवतील फिट! डोंगरची काळी मैना- पावसाळ्यात खायलाच हवं हे पिटुकलं फळ

करवंदात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व ए असते. ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. करवंद खाल्यामुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि इतर समस्य कमी होतात.