आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

Updated:May 8, 2025 13:03 IST2025-05-08T12:48:48+5:302025-05-08T13:03:43+5:30

8 ways to stop aamras from turning brown : brilliant hacks to save aamras from turning brown : आंब्याचा रस काढून फ्रिजमध्ये ठेवला तरी तो काळा पडतो, अशावेळी काय करावं ते पाहा...

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आंब्याचा सिझन म्हटलं की आमरसाचा बेत अनेकदा होतोच. उन्हाळ्यात आमरस (8 ways to stop aamras from turning brown) खाल्ला नाही असे होऊच शकणार नाही. आपण आंब्याचा सिझन आला की हमखास आमरस तयार करतोच, परंतु अनेकदा बऱ्याच गृहिणींची तक्रार असते की आमरस तयार केल्यानंतर तो काही तासानंतर लगेच काळा पडतो.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

काहीजण वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या आंब्याचा रस (brilliant hacks to save aamras from turning brown) काढून तो स्टोअर करून ठेवतात, परंतु कितीही काळजीपूर्वक पद्धतीने आमरस स्टोअर करून ठेवला तरी काही दिवसांनी तो काळपट दिसतो.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आमरस म्हटलं की तो पिवळाधमक, घट्ट, दाटसर आणि चवीला गोड असा असेल, तरच खायला मज्जा येते. आमरसाचा पिवळाधमक रंग बदलून तो काळपट होऊ लागला की तो बघून खाण्याची इच्छाच होत नाही. अशा परिस्थितीत, महागामोलाचा आमरस तयार केल्यावर तो काळपट पडू नये म्हणून खास टिप्स पाहूयात.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आमरस तयार करण्यासाठी आंबे नेहमी चांगल्या दर्जाचे आणि संपूर्णपणे पिकलेलेच घ्यावेत. आमरस तयार करण्यापूर्वी आंबे पाण्यांत काहीवेळासाठी भिजत ठेवा. आमरस करताना मिक्सरमध्ये फिरवून घेऊ नका. कारण आमरस स्टीलच्या संपर्कात आल्याने ॲसिडिक रिॲक्शन होते. त्यामुळे आमरस लगेच काळपट पडतो.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आमरस तयार करताना किंवा स्टोअर करण्यासाठी काच किंवा मातीच्या भांड्यांचा वापर करावा. आपल्याला आमरस फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर, त्याच्यावर काचेचं, लाकडी किंवा मातीचं झाकण ठेवावे. आमरस फ्रिजमध्ये उघडाच ठेवू नये, नेहमी झाकून ठेवावा नाहीतर आमरस लगेच काळा पडतो.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आंब्याचा रस काढून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार साखर घालावी. रवीने साखर घुसळून एकजीव करून घ्यावी. साखरेमुळे आमरसाला चांगली चव येते सोबतच आमरसाला चमकदारपणा येण्यास देखील मदत होते.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

काहीजण आमरस पातळ होण्यासाठी त्यात थोडे दूध मिसळतात परंतु दूध घातल्याने आमरस काळा पडतो. यासाठीच आमरसामध्ये दूध घालून नका.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आमरस तयार करताना रस काढून आंब्याची कोय बाजूला ठेवा. आमरस तयार झाल्यानंतर त्यात कोय घालून ठेवा, असे केल्याने आमरस ७ ते ८ तास काळा पडत नाही.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आमरस स्टोअर करून ठेवायाचा असेल तर तो फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी डीप फ्रिजरमध्ये ठेवावा, जेणेकरून आमरस काळा पडत नाही.

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...

आमरस तयार झाल्यावर तो हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवावा, यामुळे त्याचा रंग आहे तसाच पिवळाधमक राहतो.