एप्रिल महिन्यात आहारात हवीच ७ भाज्या आणि फळं, मिळवा सिझन स्पेशल ताकद आणि पोषण
Updated:March 30, 2025 14:40 IST2025-03-30T14:35:37+5:302025-03-30T14:40:01+5:30
7 vegetables and fruits you must have in your diet in April : एप्रिलमध्ये या काही भाज्या खाणे गरजेचे आहे. कारण हंगामी पदार्थांमध्ये जास्त पोषण असते.

प्रत्येक महिन्यामध्ये काय खावे काय नाही याचा विचार करायला हवा. हंगामी पदार्थ खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. तसेच ताजी भाजी व फळे खायला मिळतात.
एप्रिल महिना म्हणजे सूर्याच्या झळांनी शरीर अगदी करपून निघणार. अशा वेळी काही फळे व भाज्याच कामी येतात. पाहा कोणते पदार्थ खाल.
एप्रिल महिन्यामध्ये ताजे आंबे मिळतात. ते खा. आंब्याचे पिक वर्षातून एकदाच येते. इतर वेळी मिळणारा आंबा नैसर्गिक नाही. त्यामुळे आंबा तर मनसोक्त खा.
एप्रिलमध्ये बाटाटाही चांगला मिळतो. बटाट्याचे उत्पादन जास्त केले जाते. तसे बटाट्याला कायमच मागणी असते तरी चैत्रामध्ये उपवास ठेवले जातात त्यामुळे मागणी वाढते.
आता चांगल्या दर्जाची कारली बाजारात मिळतील. कारले चवीला कडू असले तरी ते अत्यंत पौष्टिक असते.
एप्रिलमध्ये फरसबीचे पीक चांगले येते. फरसबीची भाजी नक्की विकत घ्या. फरसबी चवीलाही छान लागते. आरोग्यासाठी फार चांगली.
चांगली काकडी आता बाजारात मिळेल. उन्हाळ्यामध्ये काकडी खाणे म्हणजे सुख. शरीरासाठी पाणी फार गरजेचे असते. पाण्याचे प्रमाण काकडीमुळे संतुलित राहते.
या महिन्यामध्ये भोपळाही चांगला मिळतो. भरीत करण्या योग्य गोड असा भोपळा नक्कीच घरी आणा. दुधी भोपळाही चांगला मिळतो.
एप्रिलमध्ये भेंडीचे उत्पादन फारच छान होते. मस्त भरलेली टवटवीत भेंडी मंडईमधून घेऊन या. भेंडीची भाजी सगळ्याच्या आवडीचीही असते.