Join us

मिक्सर सतत बिघडतो-पाती तुटतात? तपासून बघा, तुम्ही मिक्सरमध्ये हे ७ पदार्थ वाटत तर नाही ना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2025 18:16 IST

1 / 8
सगळ्याच घरात स्वयंपाक करण्यासाठी मिक्सरचा वापर होतो. मिक्सरच्या वापरामुळे कोणत्याही पदार्थाची पेस्ट-पावडर तयार करणं सोपे होते. खरंतर मिक्सरमुळे अनेक काम सोपी झाली आहेत. शिवाय कमी वेळात झटपट जेवण तयार होते. पण मिक्सरचं भांडं बिघडलं किंवा मिक्सरच्या भांड्याच्या पातींमधील धार कमी झाली तर तुम्ही त्यात कोणते पदार्थ वाटत आहात ते एकदा तपासून पाहा. मिक्सर सतत बिघडत असेल, पाती तुटत असतील तर मिक्सरच्या भांड्यात वाटू नयेत असे पदार्थ कोणते ते पाहा.
2 / 8
मिक्सरमध्ये कच्ची सुकी हळद म्हणजेच हळकुंड वाटल्याने मिक्सरची मोटर आणि ब्लेड दोन्ही खराब होऊ शकते. हळद खूप कडक असते आणि ती बारीक केल्याने मिक्सरच्या मोटरवर जास्त दाब पडतो, ज्यामुळे मोटर जळण्याचा धोका वाढतो.
3 / 8
बदाम, अक्रोड आणि काजू सारखे ड्रायफ्रुट्स मिक्सरच्या ब्लेडला नुकसान पोहोचवू शकतात. त्यांच्या कडकपणामुळे ब्लेडची धार कमी होऊ शकते आणि मोटरवर अतिरिक्त ताण देखील येऊ शकतो. ड्रायफ्रूट्स हलके भिजवा किंवा त्यांचे छोटे तुकडे करून मगच मिक्सरमध्ये वाटून बारीक करा.
4 / 8
दालचिनी, काळीमिरी आणि लवंग यांसारखे खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक केल्याने मिक्सरच्या भांड्याचे ब्लेड व मिक्सर जार खराब होऊ शकतो.
5 / 8
बरेचजण ब्लेंडरमध्ये गरम पदार्थ घालून वाटण तयार करतात. पण गरम पदार्थ वाटत असताना ब्लेंडरमध्ये त्वरित दाब निर्माण होते. यामुळे ब्लेंडरचे झाकण फुटू शकते, किंवा ब्लेंडरची पानं खराब होऊ शकतात.
6 / 8
बर्फाचे मोठे तुकडे मिक्सरचे ब्लेड आणि जार खराब करू शकतात. बर्फाच्या कडकपणामुळे मिक्सरचे ब्लेड बोथट होऊ शकते. अशा स्थितीत बर्फाचे आधी छोटे तुकडे करून नंतर ते मिक्सरमध्ये घालून बारीक करा.
7 / 8
फ्रोजन फ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक केल्याने ब्लेंडरची धार कमी होते. याशिवाय पानं देखील तुटतात. जर आपल्याला फळे किंवा भाज्या ब्लेंडरमध्ये घालून ज्यूस तयार करायचा असेल तर, १० ते १५ मिनिटांसाठी बाहेर काढून ठेवा. फळे व भाजी डिफ्रॉस्ट केल्यानंतरच त्याचा ज्यूस तयार करा.
8 / 8
स्टार्चयुक्त पदार्थ जसे की बटाटे ब्लेंडरमध्ये वाटल्याने त्याची पानं तुटू शकतात, किंवा त्यातील धार कमी होऊ शकते. बटाट्यामध्ये भरपूर स्टार्च असते. शिवाय ते चिकट असतात. ज्यामुळे ते नीट ब्लेंड होत नाही. त्यामुळे बटाटे कधीही ब्लेंडरमध्ये घालून बारीक करू नका.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.सोशल व्हायरल