1 / 9उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारची फळे आपण खातो. काही फळे फार लोकप्रिय आहेत, जसे की कलिंगड. कलिंगड लहान मुलांनाही आवडते आणि मोठ्यांनाही. सगळेच आवडीने खातात.2 / 9मस्त रसरशीत लाल कलिंगड उन्हाळ्याच्या उष्ण दिवसामध्ये खायला मिळाल्यावर मनाला समाधान व पोटाला थंडावा मिळतो. कलिंगड एकतर आपण नुसते खातो किंवा मग ज्यूस करून पितो. कलिंगडाच्या सालाची भाजीही केली जाते.3 / 9कलिंगडाचे कॉम्बिनेशन काही पदार्थांबरोबर फार छान लागते. कलिंगडाची अशी ६ सॅलेड करून पाहा. नक्कीच आवडतील. तसेच पौष्टिकही आहेत. कलिंगडामध्ये दूध घालण्याऐवजी या काही पदार्थांबरोबर कलिंगडाचे मिश्रण करा.4 / 9कलिंगड चाट कधी खाल्ले आहे का? कलिंगड, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, भाजलेले दाणे, चाट मसाला असे सगळे पदार्थ मिक्स करा. त्यावर लिंबाचा रस पिळा.5 / 9कलिंगड व काकडी दोन्ही पदार्थ थंडावा देणारे आहेत. कलिंगडाचे काप करा, त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी घाला. त्यावर मीठ टाका. लाल तिखट टाका. आणि मिक्स करून मस्त मज्जा घेत खा.6 / 9वेस्टर्न पाककलेत फळे व चीज हे कॉम्बिनेशन फेमस आहे. चीज पायनॅपल जसे लोकप्रिय आहे, तसेच कलिंगड व फेटा चीजचे सॅलेडही लोक आवडीने खातात. त्यावर ओरेगॅनो टाका, तसेच मीठ, चाट मसाला टाका.7 / 9जसे चीजबरोबर कलिंगडाचे कॉम्बिनेशन केले जाते, तसेच पनीरबरोबरही केले जाते. मोठ्या हॉटेल्समध्ये असे पदार्थ फार महाग विकले जातात.8 / 9मोड आलेली कडधान्ये, कलिंगड, काकडी, डाळिंबाचे दाणे व डाळिंबाचा रस घालून वरतून पिस्ता घालायचा. या पदार्थाला मेडीटेरेनियन सॅलेड असे म्हणतात. ते फार पौष्टिक मानले जाते.9 / 9फ्रुट सॅलेड तर तुम्ही नक्कीच खाल्ले असेल. आवडीची सगळी फळे मिक्स करा. कलिंगड, केळे, द्राक्ष, सफरचंद अशी सगळी फळे एकत्र करून हे सॅलेड करता येते.