Join us

उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळून दमलेल्या मुलांसाठी ६ स्पेशल पदार्थ, खास खाऊ- करायला सोपा आणि पौष्टिकही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2025 11:32 IST

1 / 9
मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की घरात नुसती धावपळ असते. कोणी लपाछपी खेळते तर कोणी पकडापकडी. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरभर खेळून झाले की जरा उन उतरल्यावर बाहेर जाऊन मातीत नुसते मळून येतात.
2 / 9
घरी आल्यावर मात्र दमलेल्या चिमुकल्यांच्या पोटात उंदीर उड्या मारत असतात. भुकेने व्याकुळ झालेल्या मुलांना काही तरी वेगळा पदार्थ खायची इच्छा असते. तेच तेच पदार्थ खाऊन त्यांना कंटाळा येतो.
3 / 9
काही झटपट करता येतील असे हे पदार्थ संध्याकाळच्या खाऊसाठी अगदीच मस्त आहेत. करायला सोपे आणि मुले बोटं चाटत खातील याची खात्री आहे. पाहा मुलांना काय खायला द्याल.
4 / 9
उन्हाळ्यात घाम येतो. दम लागतो. खेळून आलेल्या मुलांना थंडाव्याची गरज असते. तसेच पोटात जीवनसत्त्व , खनिजे जाण्याची गरज असते. त्यांना विविध फळांनी सजवलेली फ्रुट प्लेट खायला द्या. मुलांना जरा सजावट करुन दिल्यावर पदार्थ रुचकर वाटतात. मस्त रंगीत फळांनी भरलेली फ्रुटप्लेट द्यायची.
5 / 9
बीटाचे कटलेट मुले अगदी आवडीने खातात. लालेचुटूक असे हे कटलेट दिसायला छान चविष्ट वाटते. त्याची चवही छानच असते. त्यात भाज्या असतात. पीठ असते. मुलांसाठी पौष्टिक असते. कटलेट तळू नका. तव्यावर कुरकुरीत परता.
6 / 9
आजकाल रोल्स हा प्रकार मुलांना आवडतो. त्यामुळे पनीर रोल किंवा मग चीज रोल असे पदार्थ त्यांना द्या. मैद्याची पोळी करु नका घरात असलेली चपाती जरा बटर लावून परता म्हणजे पोटात मैदा जाणार नाही.
7 / 9
मस्त क्रिस्पी होईपर्यंत परतलेले सॅण्डविच मुलांना खायला द्या. त्यात सॉस लावा. छान चटणी लावा. भाज्या घाला. ब्रेडही मैद्याचा नाही तर ग्रेनचा वापरा.
8 / 9
डाळींचे डोसे हा पदार्थ करायला अगदीच सोपा आहे. झटपट डोसे लावायचे. परतताना तुपावर परतायचे. मूग, तांदूळ, चणाडाळ, मूग डाळ, उडदाची डाळ विविध डाळी वापरा.
9 / 9
मुलांना आवडेलही आणि पौष्टिकही असेल असा पदार्थ म्हणजे ओली भेळ. घरी केलेली भेळ नक्कीच आरोग्यासाठी चांगली असते. त्यात भाज्या घाला. चटणी घाला शेव घाला. कुरमुरे घाला छान मिक्स करा.
टॅग्स : समर स्पेशलअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.