झटपट चविष्ट स्वयंपाक करण्यासाठी ६ टिप्स-घाईगडबडीत केला स्वयंपाक तरी पदार्थ बिघडणार नाही
Updated:August 18, 2025 17:55 IST2025-08-18T16:58:39+5:302025-08-18T17:55:28+5:30

स्वयंपाक करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमचा स्वयंपाक खूप लवकर, कमी वेळेत होऊ शकतो. (6 kitchen tips for fast cooking)
चॉपिंग बोर्डवर थोडं मीठ घाला आणि मग कांदा चिरा. कांदा चिरताना अजिबात डोळ्यांतून पाणी येणार नाही. (5 Cooking Hacks for Fast & Easy Cooking)
शेजवान राईस, फ्राईड राईस, बिर्याणी, पुलाव, मसालेभात असं काहीही करणार असाल तर भात ५ ते ६ तास आधी शिजवून ठेवा. भात खूप मोकळा होईल.
लसूण सोलण्याचं काम सोपं होण्यासाठी लसूण पाकळ्या पोळपाटावर ठेवा आणि त्यावरून अलगदपणे लाटणं फिरवा. लसणाची टरफलं निघून लसूण सोलला जाईल.
भाज्या बाजारातून आणल्यानंतर धुवूनच फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून स्वयंपाक करताना भाज्या धुण्यामध्ये, स्वच्छ करण्यामध्ये वेळ जाणार नाही.
डाळ, तांदूळ, रवा, पोहे, शेंगदाणे नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात अळ्या, किडे होणार नाहीत ना, याची काळजी घ्या. जेणेकरून ते स्वच्छ करण्यात खूप वेळ जणार नाही.
शेंगदाणे, खोबरे, दाळवं, फुटाणे यांची पावडर करून ठेवा. पातळ भाज्यांमध्ये ही पावडर घातली की भाजी लगेच दाटून येते आणि पटकन होते.