भरपूर फायबर असलेले ६ पदार्थ, चवीलाही मस्त आणि रोज पोट होईल साफ विनात्रास
Updated:May 5, 2025 16:32 IST2025-05-05T16:22:47+5:302025-05-05T16:32:33+5:30
6 foods rich in fiber, taste great and will keep your stomach clean every day without any problems : चवीलाही चांगले आणि फायबरने भरलेले असे हे पदार्थ आहारात असणे गरजेचे. पाहा कोणते पदार्थ आहेत.

फायबर हा आहारातील विविध महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे. फायबर शरीरासाठी फार गरजेचे असले तरी ते शरीरामार्फत तयार होत नाही. त्यासाठी विविध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा लागतो.
पचन प्रक्रियेसाठी फायबर गरजेचे असते. शरीरातील फायबर कमी झाल्यावर बद्धकोष्टाता, अपचन, गॅसेस असे त्रास सुरू होतात. त्यामुळे शरीरातील फायबर कमी होणार नाही याची काळजी घ्या.
फायबरचे प्रमाण भरपूर असणारे काही पदार्थ असतात. ते रोजच्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे. फायबरचे प्रमाण संतुलित राहावे म्हणून हे पदार्थ खा.
हिरवे मटार फायबरने भरलेले असतात. दाणे असलेले पदार्थ खावे ज्यांना आपण शेंगा म्हणतो. त्यामध्ये फायबर असते.
छोले फार आवडीने खाता का? छोले म्हणजे काबुली चण्याची भाजी. काबुली चण्यात फायबर भरपूर असते. त्यामुळे छोले तर खाच शिवाय काबुली चणे उकडून मीठ मसाला लाऊन खाणेही चांगलेच ठरेल.
सुकामेवा आवडत असेल तर त्यात बदाम खा. तसेच अक्रोड खा. या दोन्ही पदार्थांमध्ये फायबर असते. प्रत्येकी दोन दोन खायचे चवीलाही छान असतात.
फळांमध्ये फायबर असते. फळे खाणे आरोग्यासाठी फार चांगले. विविध फळे खाच मात्र फायबर मिळवण्यासाठी सफरचंद तसेच केळं खाणे फार फायद्याचे आहे.
रताळे उकडून छान लागते. आहारात रताळे असावे. रताळे फायबरने परिपूर्ण असते. तसेच गाजरामध्ये फायबर असते. सॅलेड खाणे अगदीच उत्तम.
विविध डाळी खा. शेंगा खायला हव्या. मसूर आहारामध्ये घेत जा. तसेच सोयाबीन खाणे चांगले ठरेल. सोयाबीन वजन कमी करण्यासाठी फायद्याचे असते.