दडपे पोहे करायच्या '५' पद्धती.. प्रत्येक रेसिपीची चव वेगळीच.. तुम्हाला कोणती आवडते?
Updated:May 2, 2025 09:15 IST2025-05-02T09:09:41+5:302025-05-02T09:15:01+5:30
'5' ways to make Dadpe Pohe, Each recipe tastes different : दडपे पोहे भाजलेले आवडतात की भिजवलेले? पाहा किती प्रकार आहेत. सगळेच प्रकार मस्त.

आपल्याकडे झटपट रेसिपींची अजिबात कमी नाही. अनेक रेसिपी आहेत ज्या पटकन करता येतात. आणि विशेष म्हणजे चवीलाही अगदी मस्त असतात. एकाच पदार्थाची रेसिपी घरोघरी वेगळी असते. पदार्थाचे नाव जरी सारखे असले तरी करायची पद्धत वेगवेगळी असते.
साधे पोहे, उपमा सारखे पदार्थही विविध पद्धतीने केले जातात. फोडणी आणि वापरले जाणारे पदार्थ सगळ्यामध्ये काही ना काही फरक असतोच.
एक फार चविष्ट असा झटपट पदार्थ आपण करतो तो म्हणजे दडपे पोहे. चवीला अप्रतिम लागतात. लगेच होतात आणि विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरूनही केले तरी छान लागतात. एखादा पदार्थ नसेल तर बेचव लागतात असे नाही.
प्रत्येकाची दडपे पोहे करण्याची पद्धत वेगळीच आहे. सगळ्याच पद्धती छान आहेत. तुम्हाला कोणत्या पद्धतीने केलेले आवडतात? इतरही पद्धती करून पाहा.
दडपे पोह्यांमध्ये नारळ घातला जातो. छान ताजा नारळ हवा, त्यासाठी ताजा नारळ फोडायचा आणि मग त्या नारळाचे जे पाणी निघते, त्या पाण्यामध्ये पोहे भिजवून ठेवायचे. नंतर तसेच ओले पोहे काही जण खातात.
नारळाच्या पाण्यामध्ये पोहे भिजवल्यानंतर ते परतायचे आणि मग त्यामध्ये इतर भाज्या घालायच्या. तसेच मसाले घालायचे. छान फोडणीही द्यायची.
भाजलेले पोहे न करता काहींना कच्चे पोहे आवडतात. पोहे तेलामध्ये घोळवायचे. त्याला छान तिखट मीठ लावायचे. मग त्यामध्ये शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे आणि इतर पदार्थ घालायचे.
न भिजवता पोहे परतायचे. अगदी कुरकुरीत व्हायला हवेत. म्हणजे मग ते खायला मज्जा येते. त्यामध्ये सांडगी मिरची चिरडून घालायची. त्याला छान लसणाची फोडणी द्यायची.
काकाडीचे दडपे पोहे उन्हाळ्यामध्ये खाणे नक्कीच पोटाला आरामदायी ठरेल. काकडी, टोमॅटो, नारळ, कांदा असे सगळे छान एकत्र करायचे.