रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

Updated:December 13, 2025 14:35 IST2025-12-13T14:27:44+5:302025-12-13T14:35:08+5:30

रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

घरातल्या मंडळींना त्याच त्याच चवीच्या भाज्या, आमटी खाऊन कंटाळा आलेला असतो. म्हणून मग काहीतरी वेगळं हवं अशी त्यांची नेहमीचीच फर्माहिश असते. अशावेळी नेमकं काय वेगळं करावं असा प्रश्न पडतो...(5 tricks for making food more tasty and delicious)

रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

खूप काही वेगळे पदार्थ करायला वेळ नसेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून स्वयंपाक करून पाहा (simple cooking tips for delicious food). रोजच्याच भाजी, वरणालाही अगदी मस्त चव येईल..(how to make food more tasty and delicious?)

रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

पहिली ट्रिक म्हणजे फोडणी झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण, आलं पेस्ट घालतो आणि मग ती परतून घेतो. असं करण्याऐवजी कढई गॅसवर ठेवताच ती थंड असतानाच त्यात तेल आणि लसूण, आलं असं सगळं एकदम घाला. कढई जशी जशी गरम हाेईल तसा तसा लसूण परतला जाईल आणि त्याची खूप खमंग चव पदार्थाला येईल.

रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

कोणताही पदार्थ झाल्यानंतर सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यावर त्या पदार्थामध्ये कोथिंबीर, पुदिना असे सुगंध देणारे पदार्थ घाला आणि नंतर त्यावर झाकण ठेवा. या पदार्थांचा छान सुगंध भाजी, आमटीला येईल. त्यामुळे चवीतही बदल जाणवेल.

रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

कधी कधी फोडणी झाल्यानंतर लगेच त्यात हळदीसोबत तिखट, गरम मसालाही घाला. यामुळे पदार्थांना थोडी स्मोकी चव येते जी अनेकांना आवडते.

रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

पदार्थांना गार्निशिंग करण्यासाठी किंवा कोशिंबीर, रायतं अशा पदार्थांवर घेण्यासाठी लोणच्यामधलं उरलेलं तेल वापरा. पदार्थांची चव आणखी खुलेल.

रोजच्याच भाजी, वरणालाही येईल अफलातून चव! ५ सोप्या ट्रिक्स, सगळेच तुम्हाला सुगरण म्हणतील

कोणताही पदार्थ केल्यानंतर अगदी तो झाल्या झाल्या सर्व्ह करू नका. त्याऐवजी कढईवर झाकण ठेवा. त्यानंतर ५ ते ७ मिनिटे होऊ द्या आणि नंतरच तो पदार्थ सर्व्ह करा. यामुळे त्या पदार्थामध्ये घातलेल्या मसाल्यांचा फ्लेवर अधिक गडद होतो आणि पदार्थाचा स्वाद खुलतो.