कार्तिकी एकादशी: उपवासाच्या दिवशी खायलाच हवे 'हे' पौष्टिक पदार्थ- ॲसिडीटी, अपचन होणार नाही
Updated:November 1, 2025 13:30 IST2025-11-01T13:26:06+5:302025-11-01T13:30:20+5:30

कार्तिकी एकादशीचा उपवास कित्येकजण करतात. पण त्यानंतर मात्र दुसऱ्यादिवशी ॲसिडीटी, छातीत जळजळ, अपचन असे त्रास अनेकांना होतात. हे सगळे त्रास टाळायचे असतील तर उपवासाच्या दिवशी काही पदार्थ खायला हवे. जेणेकरून ते पोटासाठीही दमदार राहतील आणि दुसऱ्यादिवशी अपचनाचा त्रास होणार नाही.
त्यातला पहिला पदार्थ म्हणजे रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ. तुम्ही रताळ्याचा किस करून खाऊ शकता किंवा रताळ्याच्या गुळामध्ये शिजवलेल्या गोड फोडी करून खाऊ शकता किंवा रताळे नुसतेच शिजवून खाऊ शकता. ते अतिशय पौष्टिक आणि पचनासाठी खूप चांगले असते.
दुसरा पदार्थ आहे राजगिरा. राजगिऱ्याच्या लाह्या, खीर, लाडू, वडी असे वेगवेगळे पदार्थ उपवासाला नक्की खा. राजगिऱ्यामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यामुळे आपल्या आहारात राजगिरा नेहमीच असायला हवा.
उपवास भाजणीचं थालिपीठ हा उपवासाच्या दिवशीसाठी सगळ्यात उत्तम आहार आहे. हे थालिपीठ पोटालाही दमदार असतं आणि त्यामुळे ॲसिडीटी, कॉन्स्टिपेशन असा कोणताही त्रास होत नाही.
ताक प्यायलाही विसरू नका. दह्यामुळे अनेकांना ॲसिडीटी होते. पण ताकामुळे मात्र शांत वाटतं. त्यामुळे भरपूर पाणी घातलेलं पातळ ताक उपवासाच्या दिवशी अधूनमधून प्यायला हवं.
उपवासाच्या दिवशी ताजी फळं खायला विसरू नका. फळांमधून ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे भरपूर मिळतात. त्यामुळे दिवसभर उर्जा टिकून राहाते.