1 / 6बहुतांश घरांमध्ये फक्त वरण भाताचा कुकर लावण्यासाठी किंवा खिचडी करण्यासाठीच प्रेशर कुकर वापरला जातो. पण त्याच्या मदतीने कित्येक अवघड कामं सोपी आणि लवकर होतात.2 / 6हिवाळा असल्याने दही लवकर लागत नाही. त्यामुळे कुकर थोडं गरम करून घ्या आणि दही लावलेलं पातेलं गरम कुकरमध्ये घालून ठेवा. दही खूप लवकर विरजेल आणि घट्ट होईल.3 / 6सध्या हिवाळा असल्याने पोळ्या खूप लवकर थंड होतात. थंड झालेल्या पोळ्या कुकरमध्ये ठेवून एखादा मिनिटे गॅस सुरू करा. सगळ्याच पोळ्या अगदी गरमागरम होतील.4 / 6इडलीचं पीठही हिवाळ्यात लवकर आंबत नाही. त्यासाठीही प्रेशर कुकरची मदत घेता येते. दह्याप्रमाणेच इडलीचं पीठही आंबविण्यासाठी गरम कुकरमध्ये ठेवून द्या. पिठाला उष्णता मिळून ते लवकर आंबवलं जाईल.5 / 6घरात ओव्हन नसेल तर कुकरचा वापर करून त्यात केक, पेस्ट्री, बिस्किटे, नानकटाई असे वेगवेगळे बेकिंग प्रोडक्ट तयार करता येात.6 / 6डाळ बट्टी खाण्याचा विचार असेल तर कुकरमध्ये तुम्ही बट्टीही खूप लवकर अणि झटपट करू शकता. एकदा ट्राय करून पाहा.