फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

Updated:March 23, 2026 17:21 IST2026-03-23T16:17:14+5:302026-03-23T17:21:58+5:30

5 delicious cauliflower dishes - from cauliflower pulao to manchurian, check out these delicious cauliflower dishes : फुलकोबीचे विविध पदार्थ, नक्कीच करुन पाहा.

फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

फुलकोबीची भाजी हा नेहमीच्या आहारात केला जाणारा साधा आणि चविष्ट पदार्थ आहे, ज्यात मसाल्यांमुळे फ्लॉवरला छान चव येते. ही भाजी पोळी किंवा भाकरीसोबत खायला खूपच छान लागते. मात्र फक्त भाजीच नाही इतरही रेसिपी आहेत.

फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

जसे की फुलकोबीचा पराठा हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असून मसालेदार सारण भरून गरमागरम पराठे खायला खूपच चविष्ट लागतात. दही किंवा लोणच्यासोबत खाल्ल्यास त्याची चव आणखी वाढते.

फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

फ्लॉवर पुलाव हा सुगंधी आणि पचायला हलका पदार्थ असून तांदूळ, फ्लॉवर आणि मसाले मस्त परतून एकजीव करुन तयार केला जातो. हा पदार्थ दुपारच्या जेवणासाठी पटकन बनवता येतो.

फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

फुलकोबीचे पकोडे हे कुरकुरीत आणि तळलेले स्नॅक्स असून चहासोबत खायला अगदी परफेक्ट लागतात. पावसाळ्यात गरमागरम पकोड्यांचा आनंद काही वेगळाच असतो. बेसनाच्या पिठात घोळवून तळायचे.

फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

फुलकोबी ६५ हा तिखट, कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थ असून तो स्टार्टर म्हणून खूप लोकप्रिय आहे. त्याचा लालसर रंग आणि खमंग चव सगळ्यांना आवडते.

फ्लॉवरचे ५ चविष्ट पदार्थ - फ्लॉवर पुलाव ते मंचुरिअन, फुलकोबीचे पाहा चमचमीत पदार्थ

फुलकोबीचे सूप हे हलके, गरम आणि पौष्टिक असून शरीराला उब देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आजारी असताना किंवा हलकं खायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. फक्त फ्लॉवर आधी वाफवून घ्या म्हणजे चव कच्ची लागत नाही.