Join us
Daily Top 2 Weekly Top 5

घरच्या भाज्यांना हॉटेलसारखी चव हवी? ५ सोप्या टिप्स- हॉटेलपेक्षाही चटकदार भाज्या करा घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2026 09:40 IST

1 / 7
घरी केलेल्या भाज्यांना हॉटेलसारखी चव हवी असेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवा... या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर मग बघा तुम्ही केलेल्या सगळ्याच भाज्या कशा मस्त चटकदार होतील.. (5 cooking tips to make restaurant style tasty gravy at home)
2 / 7
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फोडणी चांगली कडकडीत हवी. यासाठी तेलही चांगले कडक तापायला हवे आणि त्यात मोहरी आणि जिरेही मस्त तडतडायला हवेत...(kitchen tips for making tasty gravy )
3 / 7
यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा कढईमध्ये घाला आणि मंद आचेवर छान परतून घ्या. परतून घेत असताना कांदा जळणार नाही, याची मात्र काळजी घ्या. कांद्यामधलं पाणी कमी पडत आहे असं वाटलं तर वरतून २ ते ३ वेळा त्यावर पाण्याचा शिबका मारा आणि कांदा चांगला शिजवून घ्या.
4 / 7
कांद्याचा उग्र कच्चा वास गेल्यानंतरच त्यामध्ये आलं, लसूण पेस्ट घाला आणि थोडंसं पाणी घालून ती देखील चांगली परतून घ्या.
5 / 7
यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटोची प्युरी घातली तरी चालेल. जेव्हा टोमॅटोचा कच्चा रंग आणि वास जाऊन ते कांदा लसूणशी छान एकजीव होतील तेव्हा त्यात इतर मसाले घाला.
6 / 7
मसाले घातल्यानंतर हवं तर थोडं तेल आणखी घाला. हळदही तेव्हाच घाला. मसाले व्यवस्थित परतून घ्या. मसाले जळत आहेत असं वाटलं तर थोडंसं पाणी घाला आणि छान तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्या.
7 / 7
यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला जी भाजी करायची असेल ती घाला. चवीनुसार मीठ, तिखट घालून वाफ येऊ द्या.. आता बघा तुम्ही केलेल्या भाज्यांना कशी मस्त चव येईल..
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स