Join us

World Bicycle Day 2025 : ९ अभिनेत्री सायकलवर फिदा, रोज चालवतात आणि म्हणतात सायकल म्हणजे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 11:23 IST

1 / 10
सायकलिंग करणे आरोग्यासाठी फार चांगला व्यायाम आहे. सायकल चालवण्यात मज्जाही फार येते. तसेच पाय अगदी फिट राहतात. स्वास्थ्य चांगले राहते.
2 / 10
कतरिना कैफ फिटनेससाठी ओळखली जाते. ती दररोज योगा करते. तिला पोहायलाही आवडते. मात्र तिला सायकलिंग करायलाही फार आवडते.
3 / 10
रकुल प्रीत सिंग अनेक प्रकारचे व्यायाम करते. मात्र तिला सायकलिंग फारच आवडते. ती बऱ्याच सायकलिंग इव्हेंट्समध्ये दिसते. ती एक कौशल्यान सायकलिस्ट आहे.
4 / 10
सारा अली खान तिचा भाऊ अब्राहिम अली खानसोबत मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंग करताना अनेक वेळा दिसते. ती सायकलिंग हा तिच्या फिटनेसचा भाग आहे.
5 / 10
सोनाक्षी सिन्हाने जवळपास ३० किलो वजन कमी केले आहे. त्यासाठी तिने अनेक व्यायाम प्रकारांचा अवलंब केला. तिला सायकल चालवायला फार आवडते. मज्जाही येते आणि व्यायामही होतो.
6 / 10
दीया मिर्झा पर्यावरण प्रेमी असून ती सायकलिंग करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देते. गेल्या वर्षी सायकलिंग डेच्या दिवशी तिने शहरांमध्ये सायकलिंग ट्रॅक्स वाढवावेत यासाठी मागणी केली.
7 / 10
ट्विंकल खन्ना मिस्टर फिट अक्षय कुमारची पत्नी आहे. दोघे एकत्र सायकलिंग करताना दिसतात. फिटनेससाठी सायकलिंगला ती महत्व देते.
8 / 10
सोनाली कुलकर्णी सायकलिंगच्या स्पर्धांमध्येही भाग घेते. तिला सायकल चालवायला प्रचंड आवडते असे तिने अनेकदा सांगितले आहे. शाळेपासून आत्तापर्यत सायकल प्रेम कधीही कमी झाले नाही. असे सोनाली सांगते.
9 / 10
शुभा खोटे ह्या एक ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आहेत. त्या १९५२ ते १९५५ या कालावधीत महिलांच्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धांमध्ये विजेती झाल्या होत्या. त्यांचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
10 / 10
सायामी खैर ही पहिली भारतीय महिला अभिनेत्री आहे जिने जर्मनीमधील होणारी ट्रायथोन पूर्ण केली. ती फक्त व्यायामासाठी सायकलिंग करत नाही. तिचा तो छंद आहे आणि ती एक कौषल्यवान राईडर आहे.
टॅग्स : सायकलिंगफिटनेस टिप्सहेल्थ टिप्ससेलिब्रिटी