Join us   

सकाळी की संध्याकाळी कधी चालल्याने वजन लवकर कमी होतं? बारीक होण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 4:51 PM

1 / 8
वजन कमी करण्यासाठी चालायला जाचयं हे सर्वांना माहीत असतं (Walking For Good Health) पण शरीराला वॉक केल्याने एक नाही तर बरेच फायदे मिळतात. वॉक केल्यास शरीराचा फिटनेस मेंटेन राहण्यास मदत होते. (Walking Benefits)
2 / 8
शरीर निरोगी राहण्याबरोबरच क्रोनिक कंडिशन्स जसं की डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि आणि हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी वॉक करणं महत्वाचे असते. (Which Is Better Morning Walk Or Evening Walk For Weight Loss)
3 / 8
वॉक केल्यानं शरीर एक्टिव्ह राहते. जे लोक रोज व्यायाम करत नाहीत त्यांनी त्यांनी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कमीत कमी चालण्याचा व्यायाम तरी करावा.
4 / 8
फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग वॉक करावे की संध्याकाळी चालायला जावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर कोणत्यावेळी चालल्याने अधिक फायदे मिळतात ते समजून घेऊ.
5 / 8
सकाळी चालण्याच्या फायद्यांबाबत बोलायचं झालं तर या वेळेत धूळ खूपच कमी असते. सकाळी चालल्याने दिवसभर शरीर फिट आणि एर्नेजेटिक राहते. या वेळेत वॉक केल्यानं डाएटरी रुटीन म्हणजे खाण्यापिण्याचे रूटीनही चांगले राहते.
6 / 8
संध्याकाळी वॉक केल्यानं शरीर रिलॅक्स राहते. मसल्स वॉर्म होतात ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा येत नाही आणि संपूर्ण शरीराचा थकवा निघून जातो.
7 / 8
संध्याकाळी रोज वॉक केल्यानं रात्री झोपही चांगली येते. संध्याकाळी की सकाळी चालायचं हे दोन्ही गोष्टींमधून १ निवडायचे असेल तर तुम्ही आपल्या शेड्यूलनुसार निवडू शकता.
8 / 8
वजन कमी करण्यासाठी अर्धा किंवा एक तास वॉक करा ज्यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी मॉर्निंग वॉक करणं पसंत करतात.
टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स