शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

Updated:June 20, 2025 09:35 IST2025-06-20T09:30:00+5:302025-06-20T09:35:01+5:30

Top 6 Exercises for People with Diabetes : Best Exercises For People With diabetes : Best Diabetes Exercises to Lower Blood Sugar Exercise : Diabetes Workout : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोत्तम आणि नैसर्गिक उपाय म्हणून ६ एक्सरसाइज करणे ठरेल फायदेशीर...

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

सध्या 'डायबिटीस' हा एक फारच कॉमन आजार मानला जातो. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. परंतु योग्य आहारासोबत नियमित एक्सरसाइज (Top 6 Exercises for People with Diabetes) केल्यास रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवता येणे सहज शक्य होते(Best Diabetes Exercises to Lower Blood Sugar Exercise).

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

काही विशिष्ट प्रकारच्या एक्सरसाइज या फक्त मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीच ( Best Exercises For People With diabetes) नव्हे तर वेटलॉससोबतच, संपूर्ण आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. कोणकोणत्या प्रकारचे एक्सरसाइज केल्यास शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत होते ते पाहूयात.

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

मधुमेही रुग्णांसाठी चालणे हा एक अत्यंत सोपा, सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम आहे. दररोज किमान ३० मिनिटे जलद गतीने चालल्यास शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते, इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि वजन नियंत्रणात राहते. चालण्यामुळे तणावही कमी होतो, जो मधुमेह नियंत्रणासाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चालणे हे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे.

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

पोहणे हा मधुमेहींसाठी उत्तम एक्सरसाइज आहे. संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून किमान ३-४ वेळा पोहतात, त्यांच्यात कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. पोहताना शरीराच्या सर्व स्नायूंचा वापर होतो, त्यामुळे संपूर्ण शरीराचा एक्सरसाइज होतो आणि कॅलरीही भरपूर प्रमाणात खर्च होतात. यासोबतच पोहण्यामुळे सांध्यांवर ताण येत नाही, त्यामुळे सांधेदुखी असलेल्या मधुमेही रुग्णांसाठी हा व्यायाम अधिक सुरक्षित ठरतो. पोहणे केल्याने शरीराची लवचिकता वाढते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

स्ट्रेंथ ट्रेनिंग हा मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत परिणामकारक एक्सरसाइज आहे. नियमितपणे हा एक्सरसाइज केल्यास शरीरातील मसल्सची वाढ होते, ज्यामुळे शरीरातील साखरेचे शोषण चांगल्या प्रकारे होते आणि रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे केवळ कॅलरीज बर्न होत नाहीत, तर शरीर अधिक मजबूत आणि तंदुरुस्त राहते. मधुमेही रुग्णांसाठी हा व्यायाम शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

योग हा भारतीय परंपरेतून मिळालेला एक प्रभावी व्यायाम प्रकार आहे, जो शरीर लवचिक, बळकट आणि संतुलित ठेवण्यास मदत करतो. विशेषतः ज्यांना दीर्घकाळापासून मधुमेह आहे, अशा रुग्णांसाठी योग अत्यंत फायदेशीर मानला जातो. संशोधनानुसार मानसिक ताण-तणावाचा थेट परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो. जास्त तणाव असेल तर शरीरातील ब्लड शुगर पातळी वाढण्याची शक्यता असते. अशावेळी योगामुळे तणाव कमी होतो, मन शांत राहते आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. प्राणायाम, भुजंगासन, पवनमुक्तासन, धनुरासन यासारखी काही विशिष्ट योगासने मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात.

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

कॅलोरीज बर्न करण्याचा एक सोपा, आरोग्यदायी आणि सहज करता येईल असा एक्सरसाइज म्हणजे जिने चढणे. या व्यायामामुळे हृदय आणि फुफ्फुसे अधिक कार्यक्षम बनतात, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. रोजच्या दैनंदिन जीवनात लिफ्टऐवजी जिने वापरणे हा मधुमेह नियंत्रणासाठी एक अत्यंत उत्तम आणि खर्चिक नसलेला उपाय ठरतो.

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

मधुमेहाचा धोका वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे वाढलेले वजन किंवा लठ्ठपणा. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी डान्स हा एक मजेशीर आणि उत्तम व्यायाम प्रकार आहे. जर एखादी व्यक्ती आठवड्यातून ३ ते ४ दिवस फक्त ३० मिनिटे डान्स करत असेल, तर त्याचे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहू शकते आणि मानसिक तणावही कमी होतो. डान्स केल्याने भरपूर प्रमाणात कॅलोरीज खर्च होतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. डान्स हा व्यायामाचा असा प्रकार आहे जो मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.