डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
Updated:July 15, 2025 15:58 IST2025-07-15T15:40:47+5:302025-07-15T15:58:18+5:30
वजन कमी करताना लोक नकळत कोणत्या चुका करतात ते जाणून घेऊया.

निरोगी आहार घेऊन, डाएटिंग करून, जिममध्ये व्यायाम करून आणि गोड पदार्थ टाळूनही बरेच लोक वजन वाढण्याने त्रस्त असतात. रोजच्या काही सवयी वजन कमी करण्यास अडथळा निर्माण करतात.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी, अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, ज्या फक्त आहार आणि व्यायामापेक्षा खूप महत्त्वाच्या आहेत. वजन कमी करताना लोक नकळत कोणत्या चुका करतात ते जाणून घेऊया.
नाश्ता न करणं
नाश्ता न केल्याने मेटाबॉलिज्म आणि ब्लड शुगर लेव्हल बिघडते, ज्यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात. यामुळे दिवसाच्या शेवटी कॅलरीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन होते, जे वजन वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
पटापट खाणं
१० मिनिटांपेक्षा कमी वेळात जेवण पूर्ण केल्याने शरीराला पोट भरल्यासारखं वाटण्यासाठी पुरेसा वेळ (सामान्यतः १५-२० मिनिटे) मिळत नाही. यामुळे पोट भरल्यासारखं वाटण्यापूर्वी जास्त कॅलरीजचं सेवन होते, ज्यामुळे अनवधानाने वजन वाढतं.
स्वीट ड्रिंक्स
सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि गोड कॉफीच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये २५-४० ग्रॅम साखर असते. ही साखर इन्सुलिन वाढवते आणि फॅट्स स्टोर करण्यास मदत करते, परंतु प्रत्यक्षात भूक भागवत नाही.
डिस्ट्रॅक्ट होऊन स्नॅकिंग
टीव्ही पाहताना किंवा मल्टीटास्किंग करताना स्नॅक्स खाल्ल्याने भूकेची जाणीव कमी होते. या स्नॅक्सिंगमुळे प्रक्रिया केलेले अन्न आणि अनावश्यक कॅलरीजचं प्रमाण वाढतं.
झोपेचा अभाव
दररोज ७-८ तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स ग्रेलिनआणि लेप्टिनमध्ये व्यत्यय येतो. हे असंतुलन साखर आणि रिफईंड कार्ब्सची क्रेव्हिंग वाढवतं.
क्रोनिक स्ट्रेस
जास्त ताणामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे भूक वाढते आणि विशेषतः पोटाभोवती फॅट्स जमा होतात. यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डरचा धोका वाढतो.