1 / 8निरोगी आणि तंदुरुस्त राहाण्यासाटी आपण नियमितपणे व्यायाम करतो. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहाते. (Best drinks before workout)2 / 8दररोज व्यायाम करणे शरीरासाठी चांगले असले तरी उन्हाळ्यात व्यायाम करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात आपल्या डिहायड्रेशनचा त्रास होतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे. (Energy drinks for workout)3 / 8व्यायाम करण्यापूर्वी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आपण काही पेयांचा आहारात समावेश करायला हवा. (Natural pre-workout drinks)4 / 8उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 5 / 8फळांच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचे सेवन करुन आपण डिहायड्रेशनची समस्या दूर करु शकतो. कलिगंड, संत्री किंवा केळीची स्मूदी पिऊ शकतो. 6 / 8व्यायाम करण्यापूर्वी नारळ पाणी प्या. नारळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. याच्या सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. ज्यामुळे आपण अधिक ऊर्जावान राहातो. 7 / 8डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबू पाण्यासह चिया सीड्सचे पाणी प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तसेच शरीर हायड्रेट राहाते. 8 / 8वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या. यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. ग्रीन टीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. ज्यामुळे ऊर्जा टिकून राहाते.