1 / 5अभिनेत्री समंथा प्रभू हिचं सौंदर्य आणि फिटनेस हा नेहमीच अनेकांसाठी उत्सूकतेचा विषय असतो. याविषयीच्या काही पोस्ट ती सोशल मिडियावरही बऱ्याचदा शेअर करते.2 / 5आता नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये ती दिवसाची सुरुवात कोणत्या खास पद्धतीने करते, याविषयी माहिती सांगत आहे. तिच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग samantharuthprabhuoffl या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.3 / 5यामध्ये ती सांगते की ती सकाळी ५: ३० वाजता उठते. त्यानंतर सगळ्यात आधी स्वत:कडे असलेल्या चांगल्या गोष्टी, पॉझिटीव्ह गोष्टी लिहून काढते आणि त्यासाठी आभार व्यक्त करते. असं केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते, असं ती मानते.4 / 5त्यानंतर ती काही मिनिटांसाठी सुर्यप्रकाशात उभी राहते. त्यानंतर wim hof पद्धतीने प्राणायाम आणि मेडिटेशन करण्यावर तिचा भर असतो. सध्या ती २५ मिनिटांसाठी इश क्रिया करते. याचा खूप चांगला परिणाम जाणवत असल्याचं ती म्हणते.5 / 5मागील काही दिवसांपासून तिने टॅपिंग म्हणजेच हलक्या हाताने किंवा हाताच्या बोटांच्या टोकाने चेहऱ्यावर थापटून मसाज करणे, असंही सुरू केलं आहे. यामुळे एनर्जी बॅलेन्स होण्यासाठी आणि स्ट्रेस, दुखणं कमी होण्यासाठी मदत होते.