Join us   

जिम नाकारुन योग करणाऱ्या सुपरफीट बॉलिवूड अभिनेत्री, देखण्या आणि हॉट,! त्या म्हणतात, योगा से ही होगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 2:30 PM

1 / 8
योगा डे च्या दिवशी आपण योगाचे महत्त्व ऐकतो. पण नियमित योगा केल्याने मन आणि शरीर दोन्हीही तंदुरुस्त राहण्यास मदत होते. बॉलिवूडमधील अनेक नामवंत अभिनेत्रींच्या फिटनेसमागे योगा हे एक महत्त्वाचे कारण आहे. (International Yoga Day 2022) नियमीतपणे योगा केल्याने त्या फिट आणि फाईन राहतात. पाहूया अशा कोणत्या अभिनेत्री आहेतडड ज्यांच्या रुटीनमध्ये योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे (Bollywood Actress doing Yoga).
2 / 8
बेबो म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली करीना कपूरची फिगर दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही अतिशय परफेक्ट आहे. यामागे ती करत असलेला व्यायाम आणि त्यातही योगा हे आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही बेबो अनेकदा फिटनेसचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते त्यामध्ये ती योगा करताना दिसते. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनाही सूर्यनमस्कार आणि इतर गोष्टी करण्याची प्रेरणा मिळत असते.
3 / 8
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील आणखी एक फिट अँड फाईन पर्सनॅलिटी आहे. मलायकाही नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध योगा पोजचे फोटो अपलोड करुन चाहत्यांना योगाचे महत्त्व पटवून देत असते. डाएट आणि फिटनेसच्या बाबतीत मलायका बऱ्यापैकी कडक असल्याचे दिसते. तिच्या स्लीम फिट असण्यामागे योगाचा नक्कीच हातभार असणार यात शंका नाही.
4 / 8
बबली गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली आलिया भट ही देखील योगाची मोठी फॅन आहे. नुकतीच कपूर घराण्याची सून झालेली आलियाही अनेकदा आपल्या घरात योगा मॅटवर विविध प्रकारचे योगा प्रकार करताना दिसते. आलियाच्या सौंदर्यामागे इतर गोष्टींबरोबरच योगा हे एक महत्त्वाचे कारण असावे असे वाटते.
5 / 8
एकेकाळी पीसीओएसचा त्रास असलेल्या सारा अली खानचे वजन ९६ किलो होते यावर आता अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण नियमितपणे व्यायाम आणि योगा केल्याने तिचे वजन तर कमी झालेच पण तिची जीवनशैली आनंदी झाल्याचे ती सांगते. उत्तम आरोग्यासाठी योगा अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगत सारा नियमीत योगाचा सराव करत असल्याचे दिसते.
6 / 8
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली शिल्पा शेट्टी तिचे वेगवेगळ्या ठिकाणचे योगाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असल्याचे दिसते. योगायनांबरोबरच शिल्पा मन:शांतीसाठी ध्यानधारणा करत असल्याचे दिसते. कुठेही फिरायला किंवा काही कामानिमित्त गेली तरी ती त्याठिकाणी आवर्जून योगा करत असल्याचे दिसते. योगा आपल्या डेली रुटीनमध्ये महत्त्वाचा असल्याचे ती आवर्जून सांगते. त्यामुळे या वयातही ती फिट असण्यामागे हेच कारण असावे असे म्हणता येईल.
7 / 8
आपल्या आजुबाजूला असणारा सततचा आवाज आणि गोंधळ यातून शांतता मिळवण्यासाठी दिया मिर्झा नियमितपणे योगा करते. शरीराबरोबरच मनाची शांती मिळवण्यासाठी योगा करणे उपय़ुक्त ठरत असल्याचे दियाचे म्हणणे आहे.
8 / 8
त्यामुळे अभिनेत्रींसारखे सुंदर आणि फिगरमध्ये दिसायचे असेल तर इतर व्यायामप्रकारांबरोबरच योगाला पर्याय नाही हे लक्षात घ्या. योगामुळे शरीर तर सुदृढ होतेच पण मनावरचा ताणही दूर होण्यास त्याची चांगली मदत होते. हाडांना बळकटी मिळण्यासोबतच शरीर लवचिक होण्यासाठी योगाची चांगली मदत होते.
टॅग्स : फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेबॉलिवूडआंतरराष्ट्रीय योग दिन