Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बाळंतपणानंतर ओटीपोट खूप सुटलं असेल तर चटकन करा आजीबाईंनी सांगितलेला उपाय, पोट महिनाभरात होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2026 17:56 IST

1 / 7
बाळंतपणानंतर पोटाचा घेर वाढण्याचा अनुभव बहुतांश जणींना येतो. या काळात पोट खूप सुटतं आणि मग ते कमी करणं खूप जड जातं..(how to reduce lower belly fat?)
2 / 7
तुमचंही ओटी पोट सगळीकडूनच थुलथुलीत झालं असेल तर एका आजीबाईंनी सांगितलेले काही उपाय करून पाहा (tips to reduce belly fat). हे जुने पारंपरिक उपाय raavi_6424 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.(how to reduce postpartum belly fat?)
3 / 7
पहिला उपाय म्हणजे रोज सकाळी अर्धा चमचा साजुक तूप आणि त्यासोबत एक गुळाचा खडा एकत्र करून खा. त्यानंतर कोमट पाणी प्या.
4 / 7
तसेच दिवसभरही थंड पाणी न पिता कोमट पाणीच प्यावे. यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते.
5 / 7
यानंतर रात्री झोपण्यापुर्वी किमान अर्धा तास तरी पालथे झोपा. यामुळे पोट थोडे दबले जाऊन पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल.
6 / 7
तीळ किंवा मोहरीचं तेल कोमट करा आणि ते लावून पोटाला रोज मसाज करा. मसाज केल्यामुळेही पोटाची चरबी खूप लवकर कमी होते.
7 / 7
यानंतर बेल्ट किंवा एखादा सुती कपडा घेऊन त्याने काही वेळ पोट बांधून ठेवा. मात्र जेवण झाल्यानंतर २ तास तरी पोट बांधणे टाळावे. तसेच रात्री झोपताना पोट बांधून झाेपू नका.
टॅग्स : फिटनेस टिप्सपाणीप्रेग्नंसी