Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पायऱ्या चढता- उतरता धाप लागते, वेगाने चाललं तरी दम लागतो? फुफ्फुसांचा स्टॅमिना वाढविण्यासाठी ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 09:35 IST

1 / 8
थोडेसे शारिरीक कष्ट झाले तरी लगेचच दम लागल्यासारखं होत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...
2 / 8
बऱ्याच जणांच्या बाबतीत आपण असं पाहातो की पायऱ्या चढताना, उतरताना त्यांना खूप धाप लागते. अगदी श्वास अडकल्यासारखं होऊन जातं.
3 / 8
किंवा काही जणांच्या बाबतीत असंही होतं की कधीतरी धावपळीच्या वेळी थोडं वेगाने चालणं झालं तरी श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. खूप दम लागतो.
4 / 8
असा त्रास तुम्हालाही नेहमीच होत असेल तर फुफ्फुसांची ताकद वाढविण्यासाठी पुढे सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा. बऱ्याचदा ज्या लोकांना कोणताही शारिरीक व्यायाम करण्याची सवय नसते त्यांच्या बाबतीत असं होतं. त्यामुळे त्यांनी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहायला हवे.
5 / 8
पहिला उपाय म्हणजे राेज अगदी १० ते १५ मिनिटे का होईना पण व्यायाम करा. कारण नियमितपणे व्यायाम केल्यास तुमच्या फुफ्फुसांची क्षमता निश्चितच वाढू शकते.
6 / 8
कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रस्त्रिका असे वेगवेगळे प्राणायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे करा. कारण फुफ्फुसांचे कार्य अधिक चांगले होण्यासाठी हे प्राणायाम निश्चितच उपयोगी ठरतात.
7 / 8
झुंबा किंवा एरोबिक्स हे व्यायाम देखील करू शकता. ज्यांना योगा, जीम, वॉकिंग असे व्यायाम आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
8 / 8
टॅग्स : फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदे