Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पन्नाशी उलटली तरी इतकी कशी हॉट दिसते शिल्पा शेट्टी? फिटनेससाठी ६ गोष्टी न चुकता करते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2025 18:50 IST

1 / 10
बॉलिवूडची 'फिटनेस आयकॉन' म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी वयाची पन्नाशी (Bollywood Fitness Queen Shilpa Shetty Diet Plan & Routine Secret) जवळ आली असली, तरी आजही ती विशीतल्या तरुणींना लाजवेल इतकी फिट आणि ग्लॅमरस दिसते. तिची सुडौल फिगर आणि कमालीची लवचिकता पाहून अनेकांना प्रश्न पडतो की, इतक्या व्यस्त वेळापत्रकातही शिल्पा स्वतःला मेंटेन कशी ठेवते?
2 / 10
शिल्पाच्या या 'एव्हरग्रीन' फिटनेसचे सिक्रेट केवळ महागड्या जिममध्ये नसून तिच्या (bollywood fitness queen shilpa shetty diet secret) शिस्तबद्ध लाईफस्टाईल, योगसाधनेत आणि घरगुती आहार यांसारख्या चांगल्या आणि हेल्दी सवयींमध्ये दडलेले आहे. ती फक्त वजन कमी करण्यावरच नाही, तर 'वेलनेस' (Wellness) म्हणजे संपूर्ण आरोग्यावर भर देते. 'डाएट' म्हणजे उपाशी राहणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य आहार घेणे हा तिचा फिटनेस मंत्र आहे.
3 / 10
बॉलिवूडची फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी आजही तिच्या परफेक्ट फिगर आणि एनर्जेटिक लूकमुळे खूपच लोकप्रिय आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःची फिगर मेंटेन ठेवणं हे सहज शक्य नसतानाही शिल्पा शेट्टीने ते अगदी सहज करून दाखवलं आहे. यामागे कोणतेही शॉर्टकट नाहीत, तर नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि शिस्तबद्ध लाईफस्टाईल हे तिच्या फिटनेसचं सिक्रेट आहे.
4 / 10
शिल्पाचे मॉर्निंग रुटीन, वर्कआउट प्लॅन आणि डाएट टिप्स नेमक्या काय आहेत, जे आपणही सहज फॉलो करू शकता ते पाहूयात.
5 / 10
१. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती आजही कमालीची फिट आणि सुंदर दिसते. शिल्पा तिच्या दिवसाची सुरुवात खूप खास पद्धतीने करते; ती सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक चमचा 'तूप' खाते आणि त्यानंतर कोमट पाणी पिते. इतकंच नाही तर, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी ती गरम पाण्यात हळद, सुंठ किंवा काळीमिरी पूड मिसळून ते पाणी पिते.
6 / 10
२. शिल्पा तिचं वर्कआउट आणि योगा रुटीन कधीच चुकवत नाही. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असते. फिट राहण्यासाठी तिच्यात असलेले हे सातत्यच तिच्या फिटनेसचं सर्वात मोठं सिक्रेट आहे. याचबरोबर, शिल्पा नियमित स्ट्रेन्थ ट्रेनिंग देखील करते, ज्यामुळे शरीराची लवचीकता, पोश्चर आणि फ्रेशनेस वाढतो.
7 / 10
३. शिल्पा शेट्टीला बाहेरच्या जेवणापेक्षा घरीच तयार केलेलं साध जेवण जास्त आवडते. ती तिच्या आहारात ऋतूनुसार मिळणाऱ्या पालेभाज्या आणि धान्यांचा समावेश करण्यावर भर देते. विशेष म्हणजे, भारतीय खाद्यसंस्कृती आणि घरगुती मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ खाण्याला तिची नेहमीच पसंती असते.
8 / 10
४. शिल्पाच्या फिटनेसचे एक मोठे सिक्रेट म्हणजे ती रात्री ८ वाजायच्या आत जेवण पूर्ण करते. यामुळे अन्नाचे नीट पचन होते आणि झोपही चांगली लागते, रात्री ती शक्यतो हलका आणि सहज पचेल असाच आहार घेते.
9 / 10
५. आठवडाभर शिस्त पाळल्यानंतर रविवारी ती तिच्या आवडीचे गोड पदार्थ मनसोक्तपणे खाते, यामुळे तिला डाएटचा कंटाळा येत नाही आणि त्यात सातत्य राहते.
10 / 10
६. दिवसभरात भरपूर पाणी पिणे हे शिल्पाच्या हायड्रेटेड राहण्याचे आणि फिट राहण्याचे साधे पण महत्त्वाचे सूत्र आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
टॅग्स : फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सशिल्पा शेट्टी