बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

Published:February 16, 2023 04:23 PM2023-02-16T16:23:20+5:302023-02-16T16:33:48+5:30

Tricks To Not To Skip Workout Session : कामाच्या बदलत्या वेळा, प्रवास यामुळे अनेकदा वर्कआऊट चुकते, व्यायामाला दांडी पडते, त्यावर हे सोपे उपाय

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

व्यायाम हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. व्यायामाने शारीरिक फायदे भरपूर प्रमाणात होतात. व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होतात, शरीरातील रक्तस्त्राव सुरळीत होतो, व्यायाम केल्याने रिफ्रेशिंग वाटते आणि नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो. व्यायाम प्रत्येक दिवशी नित्यनियमाने करायला हवाच. परंतु सद्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटातील लोकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कमी वयातच आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार, सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारखे आजार संभवतात. या व्यस्त जीवनशैलीमुळे आपले वर्कआऊट सेशन स्किप होऊ नये म्हणून काही उपाय लक्षात ठेवू(Tricks To Not To Skip Workout Session).

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

घरी वर्कआऊट करताना काही कारणास्तव वारंवार वर्कआऊट सेशनची वेळ चुकत असेल तर वर्कआऊटची एकच वेळ निश्चित करा. वर्कआऊटची एक निश्चित वेळ ठरवल्यावर आपण कितीही व्यस्त असलात तरीही त्या वेळी केवळ वर्कआऊट करण्यावर फोकस करावे. वर्कआऊटची एकच निश्चित वेळ ठरवल्यावर वर्कआऊट सेशन चुकण्याचे किंवा मिस होण्याच्या शक्यता कमी होतात.

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

जर आपल्याला एकट्यानेच वर्कआऊट करण्याचा कंटाळा येत असेल तर वर्कआऊट साथीदार शोधा. काहीवेळा एकट्यानेच वर्कआऊट करणे कंटाळवाणे ठरु शकते. यामुळे कंटाळून आपण वर्कआऊट सेशनला उपस्थित राहत नाही. अशावेळी आपल्यासारखे फिटनेस गोल्स असणाऱ्या व्यक्तीची निवड करा आणि त्या व्यक्तीसोबत दररोज वर्कआऊट करण्यास सुरुवात करावी.

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

वर्कआऊट सुरु करण्याआधी फिटनेस संदर्भात लहान - लहान गोल्स सेट करावे. फिटनेस संदर्भात स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी सर्वप्रथम लहान - लहान गोल्स सेट करावेत. सुरुवातीला महिन्यातून एकूण २० ते २५ तास व्यायाम करण्याचे आव्हान स्वतःला द्यावे. १ महिना झाल्यावर आपण ते गोल पूर्ण केले आहे की नाही, आपले काय चुकले आहे याचा अभ्यास करावा. आपल्यासमोर जर फिटनेस संदर्भात काही गोल्स असतील तर आपण वर्कआऊट सेशन न चुकता दररोज अटेंड कराल.

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

फिट आणि अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी आपल्या आवडीचे वर्कआऊट प्रकार निवडा. जर आपण झुंबा, डान्स, पिलाटेज, स्विमिंग अशा विविध अ‍ॅक्टिव्हिटीज करणे पसंत करत असाल तर वर्कआऊट करताना या अ‍ॅक्टिव्हिटीज करा. जेणेकरून आपल्या आवडीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज करण्याला प्राधान्य देणार असाल तर वर्कआऊट सेशनला ब्रेक देण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

जर आपले वर्कआऊट सेशन वारंवार स्किप होत असेल, किंवा वर्कआऊट करण्याचा कंटाळा आला असेल तर गाण्याच्या तालावर वर्कआऊट करा. कधी कधी आपल्याला वर्कआऊट करण्याचा कंटाळा येतो अशावेळी कंटाळा दूर घालविण्यासाठी आपल्या आवडीचे गाणे, किंवा फास्ट बीट्सचे गाणे लावून त्या तालावर वर्कआऊट करण्यास सुरुवात करावी. गाण्याच्या तालावर वर्कआऊट केल्यामुळे आपला कंटाळा दूर होऊन वर्कआऊट करण्यास मज्जा येईल. यामुळे आपले वर्कआऊट सेशन स्किपही होणार नाही.

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

सकस, पौष्टिक आहार आणि पुरेशा तासांची झोप घेतल्यामुळे आपले शरीर नेहमी फिट आणि रिफ्रेश राहील. जर आपल्याला फिट आणि रिफ्रेश वाटत असेल तर आपण वर्कआऊट करण्यासाठी तयार व्हाल. योग्य आहार आणि पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला वर्कआऊट दरम्यान थकवा जाणवेल. शारीरिक थकवा आल्यामुळे आपले वर्कआऊट सेशन स्किप होऊ शकते. म्हणूनच वर्कआऊट सोबतच योग्य डाएट आणि संपूर्ण झोप होणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

बिझी लाइफस्टाइलमुळे सतत व्यायामाला दांडी मारावी लागते? ७ उपाय, व्यायाम ठरवूनही चुकणार नाही!

घरात हाय - इंटेंसिटी वर्कआऊट करण्याचा प्रयत्न करु नका. हाय - इंटेंसिटी वर्कआऊट करण्यासाठी घरात पुरेशी जागा नसल्यांस हाय - इंटेंसिटी वर्कआऊटचा हवा तसा फायदा आपल्या शरीराला होत नाही. म्हणून घरात वर्कआऊट करताना सध्या सोप्या एक्सरसाइज मुव्ह्ज करण्यावर जास्त भर द्यावा. आपल्याला हवा तसा एक्सरसाइज करता आला नाही तर आपला एक्सरसाइज करण्याचा मूड निघून जातो. यामुळे आपले बरेचसे वर्कआऊट सेशन स्किप होतात. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागेत योग्य तो वर्कआऊट करण्याचा प्रयत्न करावा.