1 / 7अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा आहार आणि जीवनशैली अगदी साधी सोपी आहे.(Anushka Sharma fitness secret) 2 / 7वयाच्या ३७ व्या वर्षी देखील ती एकदम फिट आणि तंदुरुस्त आहे. ती मात्र नित्यनियमाने आपले डाएट फॉलो करते. जर तिच्यासारखे फिट राहायचे असेल तर ती आहारात काय खाते हे पाहूया. (Anushka Sharma diet plan)3 / 7तिच्या अनेक मुलाखतीत तिने सांगितले आहे की, फिट राहण्यासाठी ती काय खाते आणि काय टाळते. एका मुलाखतीत तिने म्हटलं की रोजच्या आहारात तीन पदार्थांचा समावेश करत नाही. (Anushka Sharma weight loss tips)4 / 7ती ग्लुटेन, साखर आणि दुग्धजन्य पदार्थ खात नाही. याऐवजी ती अनेक पर्यायी पदार्थ खाते ज्यामुळे हेल्दी आणि फिट आहे. 5 / 7गव्हामध्ये अधिक प्रमाणात ग्लुटेन असते जे आपल्या शरीरातील सेलिआक रोगाचा धोका अधिक वाढवते. हा आजार शरीरातील ग्लुटेनला प्रतिक्रिया देऊन पचनसंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे अनुष्का ग्लुटेन असणारे पदार्थ खात नाही. 6 / 7अनुष्का म्हणते की गव्हाऐवजी नाचणी, बाजरी, ज्वारी किंवा क्विनोआसारखे धान्य आपल्या आहारात असायला हवे. 7 / 7दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅट जास्त असते. त्यासाठी अनुष्का पर्याय म्हणून बदामाचे दूध घेते. यात व्हिटॅमिन ई चा उत्तम स्त्रोत आहे. जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.