1 / 10करिना कपूर नियमितपणे व्यायाम करते, त्याविषयीच्या वेगवेगळ्या पोस्टही ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यापैकी तिच्या फिटनेस ट्रेनरने करिनाचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये करिना एक खास व्यायाम करताना दिसत आहे.2 / 10जमिनीवर पाठीवर झोपायचं आणि पाय सरळ रेषेत ठेवून भिंतीला लावायचे असा हा व्यायाम आहे. यालाच विपरित करणी असे म्हणतात. हा व्यायाम नियमितपणे करणे अतिशय फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापुर्वीही तुम्ही हा व्यायाम करू शकता. सुरुवातीला १ ते ३ मिनिटांसाठी करावा आणि त्यानंतर वेळ वाढवत नेऊन तो १० मिनिटांसाठी करावा.. विपरित करणी व्यायाम नियमितपणे केल्यास काय फायदे होतात ते पाहूया..3 / 10बऱ्याच महिलांना रात्रीच्यावेळी पोटऱ्या दुखण्याचा, पाय ओढल्यासारखे होण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी विपरित करणी फायदेशीर ठरते.4 / 10इन्फ्लामेशन म्हणजेच शरीरावरची सूज कमी करण्यासाठीही हा व्यायाम नियमितपणे करावा. यामुळे नक्कीच इंचेस लॉस होतो.5 / 10विपरित करणी नियमितपणे केल्यास पोटाच्या भागात योग्य प्रमाणात रक्तप्रवाह होतो. त्यामुळे ब्लोटिंग, कॉन्स्टीपेशन अशा पचनाच्या वेगवेगळ्या समस्या कमी होतात.6 / 10हा व्यायाम नियमितपणे केल्यास एन्झायटी, स्ट्रेस कमी होऊन मन शांत, हलकं होतं.7 / 10विपरित करणी व्यायाम केल्याने शरीरातील रक्तपुरवठा अधिक चांगला होतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.8 / 10बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच शरीर आणि त्वचा दोन्हीही निरोगी राहाते.9 / 10ज्यांना रात्री लवकर झोप लागत नाही किंवा झोप लागली तरी लगेच जाग येते, शांत झोप होत नाही त्यांनी रात्री झोपण्याच्या आधी काही मिनिटांसाठी विपरित करणी करावी. शांत झोप लागेल.10 / 10रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही विपरित करणी हा व्यायाम फायदेशीर ठरतो.