अंग आखडून गेलं? ६ व्यायाम करा, शरीर होईल लवचिक आणि वजनही झरझर उतरेल..
Updated:January 25, 2025 14:30 IST2025-01-25T14:25:16+5:302025-01-25T14:30:24+5:30

हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा अंग आखडून गेल्यासारखं होतं. काही जणांना तर पाठ, कंबर, मान दुखण्याचा त्रास नेहमीच होतो. असा त्रास होऊ नये आणि आखडून गेलेलं अंग मोकळं होऊन लवचिक व्हावं, यासाठी हे काही व्यायाम नियमितपणे करून पाहा..
पहिला व्यायाम आहे अधोमुख श्वानासन. हा व्यायाम केल्याने मांडी, पाठ, हाताचे स्नायू व्यवस्थित ताणले जाऊन त्यांना बळकटी येते.
वीरासन करणेही खूप फायद्याचे ठरते. वीरासन केल्यामुळे हात, पाय यांना बळकटी येते. फुफ्फुसांना ताकद येऊन स्टॅमिना वाढविण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
शरीराची लवचिकता वाढविणारे वृक्षासन एकाग्रता वाढविण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.
आखडून गेलेली पाठ, कंबर, मान मोकळी करण्यासाठी आणि पाठीचा कणा लवचिक होण्यासाठी भुजंगासन केल्याने खूप फायदा होतो.
बालासन केल्याने शारिरीक आणि मानसिक थकवा खूप लवकर कमी होतो. शिवाय हिप्स, मांड्या आणि कंबरेच्या स्नायूंचा खूप छान व्यायाम होतो.
शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी सेतूबंधासन करणेही खूप फायद्याचे ठरते.