1 / 7वजन कमी करण्यासाठी ६-६-६ हा वॉकिंग फॉर्म्युला सध्या खूप ट्रेडिंग आहे.(6-6-6 walking method for weight loss)2 / 7वाढतं वजन कमी करण्यासाठी नियमितपणे वॉकिंग करणे हा एक चांगला पर्याय आहे, हे आपल्याला माहिती आहे (how to walk for fast weight loss?). पण आता नुसतंच वॉकिंग करण्यापेक्षा ६- ६- ६ या पद्धतीने वॉकिंग करा आणि वजन घटवा असं तज्ज्ञ सांगत आहेत.(6-6-6 walking trick for reducing belly fat)3 / 7हा फॉर्म्युला नेमका काय आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होत जातो ते पाहूया..4 / 7या वेटलॉस पद्धतीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर प्रत्येकवेळी फक्त ६ मिनिटांसाठी brisk walking करा. यामध्ये तुमच्या चालण्याची स्पीड अशी हवी की त्या ६ मिनिटांत तुमची २००० पावलं चालून व्हायला हवी.5 / 7जेवण झाल्यानंतर लगेच चालू नका. अर्ध्या तासाचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर चाला. काही जणांना व्यायाम करण्यासाठी किंवा वॉकिंगला जाण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. ते लोक अशा पद्धतीने दिवसभरातून ३ वेळा ६- ६- ६ मिनिटांचा वेळ नक्कीच काढू शकतात. यासाठी तुम्ही घरातल्या घरात, ऑफिसमध्येही चालू शकता. किंवा पायऱ्या चढणे- उतरणे अशा पद्धतीनेही करू शकता. 6 / 7या पद्धतीने वॉकिंग केल्यास पचनक्रिया, चयापचय क्रिया अधिक चांगली होते. त्यामुळे आपाेआपच वजन कमी होण्यास, शरीरातील अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते.7 / 7या पद्धतीने वॉकिंग केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासही मदत होते. त्यामुळे मधुमेह आणि प्री- डायबिटीक स्टेजमध्ये असणाऱ्या लोकांना त्याचा विशेष फायदा होतो.