Join us

सकाळी उठल्याउठल्या अंग आखडल्यासारखं वाटतं? ५ गोष्टी करा, शरीर होईल कापसासारखं हलकं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 14:13 IST

1 / 7
बऱ्याचदा असं होतं की सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. अंग आखडून गेल्यासारखं वाटतं.
2 / 7
मान, पाठ, कंबर आखडून गेल्यासारखे होतात. त्यामुळे अंग जड पडल्यासारखं हाेतं. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. असं झालं असेल तर काही योगासनं तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. ती नेमकी कोणती ते पाहा...
3 / 7
पहिला व्यायाम म्हणजे ताडासन. ताडासन करण्यासाठी ताठ उभे राहा. दोन्ही तळहात एकमेकांत गुंफून घ्या आणि मग जेवढे ताणले जातील तेवढे ताणून वर घ्या. टाचा उचला आणि बोटांवर सगळ्या शरीराचा भार पेला. यामुळे पाठ, हात, खांदे मोकळे होता
4 / 7
दुसरा व्यायाम म्हणजे भुजंगासन. या व्यायामामुळे पाठीच्या कण्याचा खूप चांगला व्यायाम होतो. तो ताणला जाऊन पाठ, कंबर, मान मोकळी हाेण्यास मदत होते.
5 / 7
तिसरा व्यायाम आहे वृक्षासन.ते करण्यासाठी उजवा पाय गुडघ्यात वाकवून वर उचला आणि उजवा तळपाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात वर करा आणि नमस्कार केल्याप्रमाणे एकमेकांना जोडा. हा व्यायाम केल्याने खांदे, दंड तर मोकळे होतातच. पण हिप्सचा भाग, पेल्विक भागही रिलॅक्स होतो.
6 / 7
चौथा व्यायाम आहे पवनमुक्तासन. यामुळे गॅसेस, अपचन, ॲसिडीटी असे त्रास कमी होतात. पोट साफ होते. त्यामुळे आपोआपच मग फ्रेश वाटू लागते.
7 / 7
सकाळी उठल्यानंतर एखाद्या मिनिटासाठी बालासन करणेही फायदेशीर ठरते. यामुळेही आखडलेले अंग मोकळे होऊन चटकन रिलॅक्स वाटते.
टॅग्स : फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेव्यायाम