फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी

Updated:January 11, 2026 09:30 IST2026-01-11T09:29:48+5:302026-01-11T09:30:02+5:30

फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी

काही दिवसांपुर्वी एका खाजगी वाहिनीवर झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या फिटनेस टिप्स शेअर केल्या आहेत.'तु काही वर्षांपुर्वी जशी दिसायचीस तशीच आताही दिसतेस, यामागचं सिक्रेट काय?' असा प्रश्न विचारला असता प्रियाने तिच्या काही साध्या सोप्या फिटनेस टिप्स शेअर केल्या.

फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी

प्रिया म्हणाली की मला मुळातच खूप काही वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड नाही. भाजी, भाकरी, ऊसळी, कोशिंबीर असं घरचं अन्न मिळालं की मी खुश असते. जंकफूड मला अजिबात आवडत नाही आणि मी ते खातही नाही. मग त्याऐवजी सूप किंवा सलाड खाऊन दिवस काढणंही तिला सहज शक्य होतं. ही तिची सवय फिटनेससाठी अतिशय महत्त्वाची आहे.

फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी

दुसरं म्हणजे प्रियाने सांगितलं की तिला जसं घरचं अन्न खूप आवडतं तशीच तिला फळंही खूप आवडतात. त्यामुळे वेगवेगळी फळं रोजच ती खाते. फळांमधले व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲण्टीऑक्सिडंट्स सौंदर्य आणि फिटनेस या दोन्हींसाठी महत्त्वाचीच आहेत.

फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी

भरपूर पाणी पिणे हा प्रियाने सांगितलेला तिसरा मुद्दा. यामुळे शरीर हायड्रेटेड राहाते. शरीरातले टॉक्झिन्स शरीराबाहेर जाण्यास मदत होते आणि शरीर शुद्ध होते.

फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी

चौथा मुद्दा म्हणजे रात्रीचं जेवण ती लवकर घेते. ७ ते साडेसातपर्यंत तिचं रात्रीचं जेवण होतं. ते ही अगदी हलकंफुलकं होतं. जेवण आणि झोप यांच्यामध्ये व्यवस्थित गॅप असल्याने अन्नपचन, मेटाबॉलिझम अधिक चांगलं होतं. त्यामुळेही शरीरावर जास्तीची चरबी साचत नाही.

फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी

सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती रोज व्यायाम करते. डाएट चांगला असणे गरजेचेच आहे. पण त्याला योग्य व्यायामाची जोड देणंही खूप गरजेचं आहे. त्यामुळे रोज व्यायाम करायलाच हवा.