Join us

हिप्स फॅट्स कमी करण्यासाठी ५ सोपे उपाय, दहा मिनिटे घरीच करा - शरीर होईल सुडौल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2025 15:56 IST

1 / 6
हिप्सवरील फॅट कमी करण्यासाठी काही सोपे आणि परिणामकारक व्यायाम आहेत. हे घरच्या घरी उपकरणांशिवाय करता येतात. दररोज हे व्यायाम २० ते ३० मिनिटे केल्यास हळूहळू हिप्सवरील फॅट कमी होऊन शरीर सुंदर दिसू लागते.
2 / 6
एका कुशीवर झोपा आणि वरचा पाय हळूवारपणे वर उचला, नंतर परत खाली आणा. प्रत्येक पायासाठी १५-२० वेळा करा. हा व्यायाम हिप्स आणि मांडींच्या स्नायूंना घट्ट करतो व चरबी कमी करण्यात मदत करतो.
3 / 6
पाठीवर झोपा, गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा. हिप्स वर उचला, शरीर सरळ रेषेत ठेवा. काही सेकंद तसेच ठेवा आणि मग हळूवार खाली या. हा व्यायाम हिप्स आणि खालच्या पाठीचा भाग मजबूत करतो.
4 / 6
पाय खांद्याएवढे अंतरावर ठेवून उभे राहा. खुर्चीवर बसल्यासारखे शरीर खाली न्यायचे आणि पुन्हा उभे राहा. हा व्यायाम हिप्स, मांड्या आणि पायांच्या स्नायूंसाठी फायद्याचा ठरतो. तसेच चरबी कमी करतो.
5 / 6
सरळ उभे राहून एका बाजूला मोठे पाऊल टाका. त्या पायाचे गुडघे वाकवा आणि दुसरा पाय सरळ ठेवा. नंतर पुन्हा ताठ उभे राहा आणि बाजू बदला. यामुळे हिप्सवर ताण येतो आणि त्या भागातील चरबी कमी होते.
6 / 6
हात गुडघ्यांवर ठेवायचे. एक पाय मागच्या बाजूला वर उचला, गुडघा ताठ ठेवा. नंतर पुन्हा खाली आणा. दोन्ही पायांनी १५-१५ वेळा करा. हा व्यायाम ग्लूट्स घट्ट करतो आणि हिप्सला सुंदर आकार देतो.
टॅग्स : व्यायामफिटनेस टिप्समहिलावेट लॉस टिप्स